शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
3
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
4
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
5
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
6
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
7
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
8
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
9
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
10
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
11
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
12
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
13
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
14
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
15
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
16
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
17
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
18
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
19
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
20
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल

भाजपच्या कारभाराला लोक कंटाळायला लागले : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 1:17 PM

भाजपच्या कारभाराला लोक आता कंटाळायला लागले आहेत .पूर्वीचेच सरकार बरे अशी लोकांची धारणा झाली आहे .नोटबंदीमूळे देशाची आर्थिक अधोगती झाली यामध्ये लवकर सुधारणा होईल असे वाटत नाही .याचा फटका तळागाळातल्या लोकांना लोकांना बसला आहे .असे सांगत माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी भाजपवर टिकास्त्रांची झोड उठवली. 

ठळक मुद्देनोटबंदी देशाची आर्थिक अधोगती झाली, तळागाळातल्या लोकांना फटकाआमदार जयंत पाटील यांनी उठवली भाजपवर टिकास्त्रांची झोड यापुढे सर्व निवडणूकात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचा विचार होईल......तर एस टीचा संप मिटवला असता

कडेगाव ,दि. २३ :  भाजपच्या कारभाराला लोक आता कंटाळायला लागले आहेत .पूर्वीचेच सरकार बरे अशी लोकांची धारणा झाली आहे. नोटबंदीमूळे देशाची आर्थिक अधोगती झाली यामध्ये लवकर सुधारणा होईल असे वाटत नाही. याचा फटका तळागाळातल्या लोकांना लोकांना बसला आहे .असे सांगत माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी भाजपवर टिकास्त्रांची झोड उठवली. 

कडेगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार जयंत पाटील बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पृथ्वीराज कदम उपस्थित होते .

आ. पाटील म्हणाले केंद्र सरकारने नॉटबंदीसारखे अनेक चुकीचे निर्णय आहेत त्यामुळे बेरोजगारी वाढत आहे. सरकारचे जाहिरातबाजीवर जास्त लक्ष आहे. सोशल मीडिया सरकारच्या विरोधात गेला आहे. सोशल मीडिया म्हणजे विशेषत: समाजातले साक्षर व बहुतांशी मध्यमवर्गीय लोक व जनमत ज्यांनी मागच्या वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधी भूमिका घेतली होती पण आता हेच लोक सरकार कडवट भूमिका घेत आहेत .याचा अर्थ जनमत सरकार विरोधी गेले आहे .

पंतप्रधान नरेंद मोदींविरोधात सोशल मीडियात पोस्ट लिहिणाऱ्यावर गुन्हा दाखल होत आहे हे योग्य नाही इंदिरा गांधी पंतप्रधान आसतानाही खूप लोक त्यांच्या विरोधात बोलत आणि लिहीत होते पण त्यांनी कुणाला अटक केली नव्हती. सरकार काही यंत्रणाच ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रसारमाध्यमातील काही इंग्रजी वाहिन्यांवर कब्जा करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. हिमाचल प्रदेश आणि गुजरातची निवडणूक पूर्वी एकाच वेळी झाली होती .पण आता निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेशची निवडणूक जाहीर करून बरेच दिवस झाले .

पाटील म्हणाले, हिमाचल प्रदेश मध्येही निवडणूक झाल्यावर कितीतरी दिवसांनी निकाल ठेवला आहे.मात्र गुजरातची निवडणूक जाहीर केलेली नाही कारण गुजरात मधील सरकारी योजनांची उदघाटने करण्याची संधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळावी तसेच प्रचारासाठी योग्य वेळ मिळावा .याचा अर्थ असा होतो की निवडणूक आयोगही मोदींच्या प्रभावाखाली आहे.

आज गुजरातमध्ये कच्चला जाणारी एक बोट पाण्यात सोडली या कार्यक्रमाची निवडणूक निवडणूक आयोग वाट बघत होते की काय असा प्रश्न उपस्थित होतो मतपेट्या किंवा मतदान यंत्रावर वेगवेगळ्या राज्यात शंका उपस्थित होत आहेत अशी घणाघाती टिकास्त्र माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी कडेगाव येथील पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर सोडली .

पाटील म्हणाले, विरोधक किती प्रभावी आहेत यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी नकोत अशी लोकांची फार मोठी धारणा झाली आहे. राहुल गांधींना प्रतिसाद वाढायला लागला आहे .त्यांच्या बोलण्याला मोठ्या प्रमाणावर लोक ट्विट करायला लागले आहेत .त्यामुळे हळूहळू वातावरण बदलेल असे माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी सांगितले .

पाटील म्हणाले, राज्यात ७९ लाख लोकांनी कजर्माफीसाठी अर्ज केले होते त्यापैकी ७ ते ८ लाखा पेक्षा जास्त लोकांना कजर्माफी मिळणे कठीण आहे .ज्या शेतकऱ्याना मुखमंत्र्यांनी कजर्माफीचे प्रमाणपत्र दिले त्यातील काही शेतकऱ्याची नावे कजर्माफीच्या यादीत नाहीत .

थोडस सरकार आॅनलाइन आहे असा कजर्माफी बद्धल उपरोधात्मक टोलाही जयंतराव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस सरकारला लगावला. सरकारचे जाहिरात प्रसार माध्यमांकडे लक्ष जास्त व गोरगरीब लोकांकडे कमी आहे. सरकारच्या योजना गोरगरीब व सवर्सामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. जाहिरात देऊन जाहीर केलेल्या योजनांनाच सरकार कट लावत आहे, असे आमदार जयंत पाटील यांनी सांगितले .

......तर एस टीचा संप मिटवला असतापाटील म्हणाले, राज्याची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली दिसत नाही .आर्थिक परिस्थिती चांगली असती तर एसटी कमर्चाऱ्यानी केलेला संप सरकारला मिटवता आला असता. पण राज्य सरकारलाही सोशल मीडियात विरोध होतोय यावर उपाय योजना म्हणून सरकारने ३०० कोटीचे जाहिरात बजेट धरलय व १० ते १२ जाहिरात इजन्सी नेमलेत, असे खर्च टाळून एस टी महामंडळाला मदत करता आली असती, असे आमदार जयंत पाटील यांनी सांगितले .काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी विचार होईलकाँग्रेस राष्ट्रवादी आघाडी झाली असती तर जिल्हा परिषदेत ४० ते ४२ जागा मिळाल्या असत्या पण यापुढे सर्व निवडणूकात याबाबत विचार होईल. सांगली महापालिकेत मात्र आमच्या तेथील सहकाऱ्याशी चर्चा करावी लागेल. कारण तेथे सध्या काँग्रेसची सत्ता आहे पण आमचीही मोठी ताकद आहे. सत्ताधारी काँग्रेसच्या कामगिरी बाबत जनमत काय आहे याचाही विचार करावा लागेल .

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलPoliticsराजकारण