मिरजेत ६२ कोटींची प्रलंबित कामे सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:20 IST2021-06-25T04:20:24+5:302021-06-25T04:20:24+5:30
मिरजेत छत्रपती शिवाजी रस्त्याचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित आहे. शास्त्री चौक ते तानंग फाटा या दहा किमी रस्त्यासाठी १०० ...

मिरजेत ६२ कोटींची प्रलंबित कामे सुरू होणार
मिरजेत छत्रपती शिवाजी रस्त्याचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित आहे. शास्त्री चौक ते तानंग फाटा या दहा किमी रस्त्यासाठी १०० कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली होती. मात्र तांत्रिक कारणाने या कामाच्या आराखड्यात बदल होऊन रस्ता दुरुस्तीचे काम रखडले होते. यामुळे केवळ खड्डे दुरुस्ती करण्यांत येत असल्याने या रस्त्यासाठी वारंवार आंदोलने सुरु आहेत. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्याच्या कामासाठी २७ कोटी निधीला मंजुरी दिल्याने आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत असल्याचेही आमदार खाडे यांनी सांगितले.
मिरज ते कृष्णा घाट रस्त्यावर रेल्वेमार्गावरील फाटकावर वारंवार रेल्वे गाड्या जात असताना वाहनधारकांना थांबावे लागते. कृष्णाघाट स्मशानभूमीकडे जाण्यासाठीही ताटकळावे लागते. कोल्हापूर जिल्ह्यातून मिरजेत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या रुग्णवाहिकांना सुद्धा याचा अडथळा होतो. त्यामुळे याठिकाणी उड्डाणपुलाची अनेक वर्षांची मागणी आहे. या कामाचे सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतरही तांत्रिक अडचणींमुळे हे काम गेली काही वर्षे रखडले होते. अखेर ३५ कोटी रुपये खर्चाच्या उड्डाणपुलाच्या कामाची महारेलकडून निविदा काढण्यात आली असून, या कामालाही लवकरच सुरुवात होणार असल्याचे आमदार सुरेश खाडे यांनी सांगितले.
यावेळी अनुसूचित जाती आघाडीचे प्रदेश चिटणीस प्रा. मोहन वनखंडे उपस्थित होते.