शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

शेतकऱ्यांचे ४०० रुपये द्या, अन्यथा २ ऑक्टोबरपासून साखर रोखणार; 'स्वाभिमानी'चा इशारा 

By अशोक डोंबाळे | Updated: September 21, 2023 14:27 IST

सांगलीतील दत्त इंडिया, मोहनराव शिंदे कारखान्यावर शेतकऱ्यांची रॅली

सांगली : मागील गळीत हंगामास गेलेल्या ऊसाला प्रति टन ४०० रुपये २ ऑक्टोबरपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पाहिजेत, अन्यथा २ ऑक्टोबरपासून कारखान्यांची साखर विक्रीस बाहेर पडू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यध्यक्ष संदीप राजोबा यांनी दिला. थकीत देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी गुरुवारी सांगलीतील दत्त इंडिया, मोहनराव शिंदे साखर कारखान्यांवर रॅली काढली होती.संदीप राजोबा म्हणाले, गेल्या वर्षभरात साखरेला व उपपदार्थास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात चांगले दर मिळाले आहेत. साखर कारखान्यांना यामधून चांगला नफा मिळालेला आहे. वाढलेल्या महागाईमुळे औषधे, खते, बी-बियाणे, कीटकनाशके यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. वाढलेल्या या महागाईमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहेत.

तोंडावर दसरा आणि दिवाळी आल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडे सणासुदीला पैसे नाहीत. त्यामुळे कारखान्याकडून तातडीने दुसरा हप्ता ४०० रुपये खात्यावर जमा केला पाहिजे. सदरचा दुसरा हप्ता २ ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न केल्यास २ ऑक्टोबरनंतर कारखान्याची साखर अडवून ढोल-ताशा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला. आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, युवा आघाडीचे अध्यक्ष संजय बेले, यू. ए. सनदे, संजय खोलकुंबे, बाबासो सांद्रे, वाळवा तालुका अध्यक्ष जगन्नाथ भोसले, युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष धन्यकुमार पाटील, बाळासो जाधव, राजेंद्र माने, सम्मेद पाटील, राजू पाटील, नंदकुमार माने, सुधीर जाधव, श्रीकृष्ण पाटील, बाबूराव शिंदे, भीमराव होनमाने, राम पाटील आदी उपस्थित होते.

व्यवस्थापनाशी चर्चा करून निर्णय घेणार : मृत्युंजय शिंदेऊसाला प्रतिटन ४०० रुपये जादा मिळाले पाहिजे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. या मागणीचा प्रस्ताव दत्त इंडिया व्यवस्थापनाच्या बैठकीत ठेवण्यात येईल. यावर व्यवस्थापन जो निर्णय घेईल, त्याची अमंलबजावणी करण्यात येईल, असे आश्वासन दत्त इंडिया कारखान्याचे उपाध्यक्ष मृत्युंजय शिंदे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी