पतंगराव कदमांवरील आरोप तथ्यहीन : मोरे
By Admin | Updated: August 24, 2014 23:13 IST2014-08-24T23:09:48+5:302014-08-24T23:13:38+5:30
असा आरोप कडेगाव काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आनंदराव मोरे यांनी पत्रकार परिषदेत केला.

पतंगराव कदमांवरील आरोप तथ्यहीन : मोरे
देवराष्ट्रे : देवराष्ट्रे (ता. कडेगाव) या यशवंतरावांच्या जन्मगावात अनेक कामे सुरू आहेत. खराब कामाबाबत चौकशी सुरू आहे. असे असताना विरोधक डॉ. कदम यांना बदनाम करण्यासाठी राजकीय हेतूने बिनबुडाचे आरोप करीत आहेत. ज्यांनी गावाच्या विकासासाठी एक रुपयाही आणला नाही, तेच आज निवडणुका डोळ्यासमोर ठेवून देवराष्ट्रेतील कामाबाबत डॉ. कदम यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप कडेगाव काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आनंदराव मोरे यांनी पत्रकार परिषदेत केला.
मोरे म्हणाले, यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी निधीतून गाव विकासासाठी आठ कोटींचा निधी आला आहे व इतर मार्गांनी आलेला निधी धरून सुमारे १८ कोटींचा निधी मिळाला आहे. या निधीतून गावाला जोडणारे रस्ते, अंतर्गत रस्ते, वाचनालय, पुतळा परिसर सुशोभिकरण, पिण्याची पाणी योजना आदींसाठी खर्च झाला आहे. विकास कामांबाबत विरोधकांनी आजपर्यंत अनेक आरोप केले आहेत, मात्र यामध्ये कोणतेही तथ्य नाही. केवळ राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवूनच बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. निकृष्ट कामाबाबत जिल्हाधिकारी यांनी चौकशी लावली आहे. यामध्ये दोषींवर कारवाई होईल. गावातील निधी बाहेर गेला नाही, तर बाहेरीलच मोठा निधी गावात खर्ची झाला
आहे. विकासासाठी येणारा जादा निधी विरोधकांच्या आरोपामुळेच थांबला असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला.
यावेळी उपसभापती मोहनराव मोरे, बी. टी. महिंद, उपसरपंच भानुदास शिरतोडे, महादेव महिंद, प्रमोद गावडे, आर. वाय. पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)