शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यावर टीका करून पक्ष वाढत नाही - राजेश क्षीरसागर 

By शीतल पाटील | Updated: October 20, 2023 19:19 IST

अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना काय केले?

सांगली : उद्धव ठाकरे गटाकडून राज्य सरकारच्याविरोधात होऊ द्या चर्चा मोहिम सुरू आहे. पण भावनात्मक होऊन टीका करून पक्ष वाढत नसतो. त्यांच्या चर्चेला आम्ही उत्तर देण्यास तयार आहोत. कुठल्या चौकात यायचे, ते सांगावे, असे आव्हान राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शुक्रवारी दिले.क्षीरसागर शुक्रवारी सांगली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, ठाकरे गट होऊ द्या चर्चा कार्यक्रम घेत आहे. पण अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना काय केले? कोरोनाच्या नावाखाली ठाकरे घरात बसले होते. उलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या काळातही रस्त्यावर उतरून लोकांना मदत करीत होते. शिंदे यांच्यावर टीका करून पक्ष वाढणार नाही. त्यांच्या आरोपांना उत्तर देण्याची लायकी नाही. तरीही आम्ही चर्चेला तयार आहोत.केवळ जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. गेल्या वर्षभरात मुख्यमंत्री शिंदे यांनी अनेक लोकहिताचे निर्णय घेतले. शासन आपल्या दारी उपक्रमाचा लाखो लोकांना फायदा झाला. मित्रा उपक्रमातून कृष्णा खोऱ्यासह राज्यातील १४ अपूर्ण प्रकल्प पूर्ण केले जाणर आहे. त्यासाठी १२६७ कोटी निधी लागणार असून जागतिक बँकेकडून कर्ज घेऊन प्रकल्प पूर्ण केले जातील. संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांदी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजन, श्रावण बाळ सेवा निवृत्त वेतन योजनेच्या अनुदानात वाढ केली. सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ योजनेला १९८६ कोटी मंजूर केले. कुपवाड ड्रेनेज योजना, इस्लामपूरला भाजी मंडई, नगरपालिकेची अद्यावत इमारत अशा अनेक कामासाठी निधी दिला आहे.

पालकमंत्र्यांना जाब विचारूविविध शासकीय समित्यात शिंदे गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना स्थान दिले जात नसल्याचे निदर्शनास आणून देताच क्षीरसागर म्हणाले की, शासकीय समित्या व निधी वाटपाबाबत राज्यपातळीवर फाॅर्म्युला ठरला आहे. पालकमंत्र्यांना त्याचे पालन करावे लागेल. लवकरच पालकमंत्र्यासोबत शिंदे गटाची बैठक घेऊन त्यांना विचारणा करू.

राष्ट्रवादीशी आघाडी केंद्राचा निर्णयराष्ट्रवादीतील एक गट महायुतीत सहभागी झाला. हा निर्णय केंद्रीय पातळीवर घेण्यात आला. काही गोष्टी नाईलाजाने स्वीकारल्या लागतात. पण अजित पवार आमच्याच विचाराने काम करीत असल्याची टिप्पणीही क्षीरसागर यांनी केली.

टॅग्स :SangliसांगलीRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागरUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे