कर्जास कंटाळून दाम्पत्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 22:54 IST2018-11-14T22:54:40+5:302018-11-14T22:54:47+5:30

कवठेमहांकाळ : गरिबीला व कर्जाला कंटाळून कवठेमहांकाळ तालुक्यातील जायगव्हाण येथे जोडप्याने राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. ...

Parent Suicide | कर्जास कंटाळून दाम्पत्याची आत्महत्या

कर्जास कंटाळून दाम्पत्याची आत्महत्या

कवठेमहांकाळ : गरिबीला व कर्जाला कंटाळून कवठेमहांकाळ तालुक्यातील जायगव्हाण येथे जोडप्याने राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. गणेश प्रकाश पाटील (वय ३५) व लीलावती गणेश पाटील (३१, रा. वडगाव रोड, जायगव्हाण) अशी या दाम्पत्याची नावे आहेत. बुधवार, दि. १४ रोजी सकाळी ९ च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. घटनेची कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, गणेश पाटील व त्यांची पत्नी लीलावती हे वडगाव रोडवरील मळ्यामध्ये राहत होते. गणेश यांचे आई, वडील वारंवार आजारी असतात. त्यांच्यावरील उपचारासाठीचा खर्च ते पेलू शकत नव्हते. उपचारासाठी गणेश यांनी उसने दीड लाख रुपये पैसे घेतले होते. तसेच त्यांनी सोसायटीचे ५0 हजाराचे कर्जही काढले होते. परिस्थिती हलाकीची असल्याने, उसने घेतलेले पैसे ते परत करू शकत नव्हते. या अवस्थेला कंटाळून या दाम्पत्याने आत्महत्या केली. गणेश व लीलावती यांना पाच वर्षाचा मुलगा व दोन वर्षाची मुलगी आहे. अधिक तपास कवठेमहांकाळ पोलीस करीत आहेत.

Web Title: Parent Suicide