शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

पेपर फुटीचा विषय गाजणार

By admin | Updated: December 23, 2015 01:21 IST

अधिकारी अडचणीत : आज स्थायी समिती सभा

सांगली : जिल्हा परिषद आरोग्य सेविका परीक्षेचा पेपर फुटल्याचे प्रकरण आणि कृषी विभागाकडील सौर पथदिवे व अभ्यासिकेच्या कामास मुदतवाढ देण्याच्या मुद्द्यावर बुधवारी, दि. २३ रोजी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. पेपर फुटीच्या प्रकरणामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना धारेवर धरण्याची तयारी पदाधिकाऱ्यांनी केली आहे. ठेकेदारांना बेकायदेशीर मुदतवाढ देण्यावरूनही कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली जाण्याची शक्यता आहे.जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांची बुधवारी होणारी ही शेवटचीच स्थायी समिती सभा आहे. यामुळे अनेक विषयांना मंजुरी देण्यावर पदाधिकाऱ्यांचा भर आहे. पण, यास अनेक सदस्य जोरदार विरोध करणार असल्याचे चित्र आहे. कृषी विभागाकडून सौर पथदिवे व अभ्यासिकांचे सव्वा कोटीचे काम एका ठेकेदाराला दिले आहे. ठेका देतानाच, दोन महिन्यात काम पूर्ण करण्याची अट घातली होती. परंतु, ठेकेदाराने ते काम पूर्ण केले नसल्यामुळे त्यांचे काम नियमानुसार रद्द होणार आहे. पण, काही पदाधिकारी या ठेकेदारास काम पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यामध्ये अधिकाऱ्यांचाही हात आहे. परंतु, बहुतांश सदस्यांचा यास विरोध असणार आहे. कारण, तीन लाखाच्या वरील सर्व कामांची ई-निविदा करण्याचा शासनाचा नियम आहे. त्यानुसार सव्वा कोटीचे काम असणाऱ्या उपक्रम खरेदीची निविदाच काढण्याच्या मागणीवर सदस्य आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.याबरोबरच आरोग्य सेविका भरतीमधील पेपर कसा फुटला?, या प्रश्नावरून अधिकाऱ्यांना धारेवर धरले जाण्याची शक्यता आहे. आरोग्य विभागातील कर्मचारी यामध्ये कसे सापडले, यासह अनेक प्रश्नावर सदस्य अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांचा समाचार घेणार असल्याची चर्चा जिल्हा परिषदेत सुरु आहे. पोलिसांनीही सूत्रधारापर्यंत पोहोचले पाहिजे, अशी मागणीही सदस्य सभेत करणार आहेत. (प्रतिनिधी)