शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

पंकज उधास यांच्या गजल गायनाने रसिक मंत्रमुग्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 11:43 PM

सांगली : प्रसिध्द गायक पद्मश्री पंकज उधास यांनी एक से बढकर एक गजल सादर करीत रविवारी रसिकांना त्यांच्या दुनियेत मश्गुल केले. सारे काही विसरायला लावणाºया या गजल सांगलीकरही गुणगुणताना दिसले. वसंतदादा पाटील जन्मशताब्दीनिमित्त आयोजित वसंतदादा महोत्सवात असाच काहीसा सांगीतिक अनुभव सांगलीकरांना पंकज उधास यांच्या आवाजाच्या माध्यमातून घेता आला.येथील डॉ. बाबासाहेब ...

सांगली : प्रसिध्द गायक पद्मश्री पंकज उधास यांनी एक से बढकर एक गजल सादर करीत रविवारी रसिकांना त्यांच्या दुनियेत मश्गुल केले. सारे काही विसरायला लावणाºया या गजल सांगलीकरही गुणगुणताना दिसले. वसंतदादा पाटील जन्मशताब्दीनिमित्त आयोजित वसंतदादा महोत्सवात असाच काहीसा सांगीतिक अनुभव सांगलीकरांना पंकज उधास यांच्या आवाजाच्या माध्यमातून घेता आला.येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणावर वसंतदादा पाटील जन्मशताब्दीनित्तिम वसंतदादा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी गजलगायक पंकज उधास यांच्या मैफलीने सांगलीकर मंत्रमुग्ध झाले. प्रारंभी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, महापौर हारूण शिकलगार, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, शैलजा पाटील, नगरसेवक राजेश नाईक, विष्णू माने, बाळासाहेब गोंधळे यांच्या उपस्थितीत दीपप्रज्ज्वलन करून मैफलीला सुरूवात झाली.मैफलीत पंकज उधास यांनी गेली ३५ वर्षे ते गात असलेल्या आणि रसिकांना मंत्रमुग्ध करणाºया त्यांच्या आवडत्या गजल सादर केल्या. संगीत रसिकांसाठी आणि त्यातही पंकज उधास यांच्या चाहत्यांसाठी त्यांचा हा कार्यक्रम जुन्या आठवणींमध्ये घेऊन जाणारा ठरला. मैफलीची सुरूवातच त्यांनी ‘वो बडे खुशनसीब होते है, जो आप जिनके करीब होते है’ या गजलने केली. त्यानंतर त्यांनी वसंतदादांच्या आठवणींना उजाळा देत दादा मुख्यमंत्री असताना त्यांना भेटण्याचा अनेकदा योग आला. राज्याच्या शैक्षणिक, शेती, सिंचन, औद्योगिक विकासात त्यांचे मोठे मोलाचे योगदान आहे. त्यांच्यामुळेच आज महाराष्ट्र देशात नंबर एकचे राज्य असल्याचे गौरवोद््गार यावेळी त्यांनी काढले.त्यानंतर त्यांनी मुमताज रशीद यांची ‘निकलो ना बेनकाब, जमाना खराब है’ ही गजल सादर केली. ‘दिवारों से मिलकर रोना, अच्छा लगता है’, ‘सबको मालूम है, मै शराबी नही’, हुई महेंगी बहोत शराब, थोडी थोडी पिया करो’, अशा अनेक सरस गजल सादर करीत सांगलीकरांना खिळवून ठेवले. ‘साजन’ चित्रपटातील ‘जियो तो जिये कैसे’, ‘चिठ्ठी आई है’ या गजलना तर रसिकांनी टाळ्या व शिट्ट्या वाजवून दाद दिली. ‘चांदी जैसा रंग है तेरा’, ‘और और अहिस्ता किजीये बाते, धडकन कोई सुन रहा होगा’ या अशा गजलांनी कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.स्मारकस्थळी आज अभिवादनकृष्णाकाठावरील वसंतदादा पाटील यांच्या स्मारकस्थळी सोमवारी सकाळी नऊ वाजता अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे. राज्यातील प्रमुख नेते, आमदार, खासदार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सायंकाळी वसंतदादा महोत्सवात प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, अभिनेत्री नेहा पेंडसे यांचा नृत्याविष्कार, शिवमणी, रवी चारी व संगीत हल्दीपूर यांचा संगीतमय कार्यक्रम येथील आंबेडकर क्रीडांगणावर होणार आहे.मदनभाऊ युवा मंचतर्फे प्रदर्शनवसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मदनभाऊ पाटील युवा मंचच्यावतीने काँग्रेस कमिटीसमोर वसंतदादांच्या जीवनातील अत्यंत दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित केले होते. या प्रदर्शनाचे उद््घाटन काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी युवा मंचचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक संतोष पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :cultureसांस्कृतिक