शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

Sangli: भाजपच्या पोकळ घोषणांचा पंचनामा करा; आमदार विक्रमसिंह सावंत यांचे पदाधिकाऱ्यांना आवाहन

By अशोक डोंबाळे | Updated: March 8, 2024 19:00 IST

सांगली : भाजपने गेल्या दहा वर्षांत अनेक आश्वासने देऊन लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या आहेत. मात्र, या निवडणुकीत भाजपचा ...

सांगली : भाजपने गेल्या दहा वर्षांत अनेक आश्वासने देऊन लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या आहेत. मात्र, या निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी १० वर्षांत त्यांनी दिलेल्या पोकळ घोषणांचा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पंचनामा करावा, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी पदाधिकाऱ्यांना केले.काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सावंत यांनी शुक्रवारी ग्रामीण पदाधिकाऱ्यांची निवड केली. या बैठकीत सावंत बोलत होते. या बैठकीला माजी जिल्हाध्यक्ष, ज्येष्ठ नेते मोहनराव कदम, युवा नेते जितेश कदम, सुभाष खोत, सिकंदर जमादार, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष सौरभ पाटील, अमित पारेकर आदी उपस्थित होते. विक्रमसिंह सावंत म्हणाले, लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. गेल्या दहा वर्षांत भाजपने जनतेची फसवणूक केली आहे. या निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे. गॅस, पेट्रोलच्या किमती वाढल्या असून, महागाई गगनाला भिडली आहे.काँग्रेसच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवडकाँग्रेसच्या बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये वरिष्ठ उपाध्यक्ष - सिकंदर जमादार (क. डिग्रज, ता. मिरज), उपाध्यक्ष - आनंदराव रासकर (कडेगाव), संदीप जाधव (येलूर, ता. वाळवा), संभाजी पाटील (बेडग, ता. मिरज), नंदकुमार शेळके (वाळवा), शिवाजी मोहिते (हरिपूर, ता. मिरज). खजिनदार - सुभाष खोत (कानडवाडी, ता. मिरज). सरचिटणीस - मिलिंद डाके (पलूस), आण्णाराव पाटील (सनमडी, ता. जत), सदाशिव खाडे (कवलापूर, ता. मिरज). सदस्य - शेखर तवटे (एरंडोली, ता. मिरज).

टॅग्स :Sangliसांगलीcongressकाँग्रेसBJPभाजपा