शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पंचगंगा नदीचे पाणी वाढले, कोल्हापूरची रेल्वे सेवा बंद होण्याची शक्यता

By संतोष भिसे | Updated: July 23, 2024 19:39 IST

सांगली : पंचगंगा नदीचे पाणी धोक्याच्या पातळीवर पोहोचल्याने मिरज ते कोल्हापूर दरम्यानची रेल्वसेवा बंद होण्याची शक्यता आहे. कोल्हापुरातून सुटणाऱ्या ...

सांगली : पंचगंगा नदीचे पाणी धोक्याच्या पातळीवर पोहोचल्याने मिरज ते कोल्हापूर दरम्यानची रेल्वसेवा बंद होण्याची शक्यता आहे. कोल्हापुरातून सुटणाऱ्या सर्व रेल्वे बंद होण्याची चिन्हे असल्याचे रेल्वेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.रेल्वेच्या पुणे विभागाने मंगळवारी सायंकाळी याबाबतचे प्रकटन जारी केले. त्यात म्हटले आहे की, मिरज ते कोल्हापूर मार्गावरील रुकडी ते कोल्हापूर मालधक्का यादरम्यानचा पंचगंगा नदीवरील रेल्वे पूल पाण्याखाली जाण्याच्या मार्गावर आहे. कोल्हापूर परिसरात गेल्या आठवडाभरापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीची पाणीपातळी पुलाजवळ धोक्याच्या पातळीच्या दिशेने वाढत आहे. राधानगरी धरणातून आणखी पाणी सोडल्यास आणि पाणलोट क्षेत्रात आणखी पाऊस झाल्यास पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. पाण्याची पातळी वाढल्यास या पुलावरून रेल्वेगाड्या बंद कराव्या लागतील. यामुळे मिरज ते कोल्हापूर सेक्शनमधील रेल्वे सेवा बंद राहणार आहे. कोल्हापुरातून एकही रेल्वे सुटू शकणार नाही.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरRainपाऊसfloodपूरrailwayरेल्वे