इस्लामपूर—पेठ रस्त्यावरील कापूरवाडी हद्दीत झालेल्या अपघातातील जखमी पेठ येथील युवकाचे गुरुवार दि. २६ रोजी कऱ्हाड येथे उपचार सुरु असताना निधन झाले. माणिक आनंदराव माळी (वय २३) असे मृत युवकाचे नाव आहे. हा अपघात मंगळवार दि. १७ रोजी झाला होता. ...
दसरा व दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर भेसळयुक्त पदार्थांचा पुरवठा रोखण्यासाठी केलेल्या कारवाईत ९ लाख ८८ हजार १० रुपयांचा अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त एस. बी. कोडगीरे यांनी दिली. ...
खिद्रापूर (जि. कोल्हापूर) येथील मालती नागेशराव कदम (वय ७४) या महिलेचे साडेपाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने व साडेसात हजाराची रोकड असा दीड लाखाचा ऐवज, त्या सांगली-कुरुंदवाड एसटी प्रवासात चोरट्यांनी लंपास केला. बुधवारी दुपारी ही घटना घडली. एसटी प्रवासात द ...
अंगात दैवी शक्तीचा संचार होतो, अशा भूलथापा मारून आष्टा (ता. वाळवा) येथे गेल्या चार वर्षापासून विविध समस्यांवर उपाय सांगून लोकांची फसवणूक करणाऱ्या भोंदू महिलेसह दोघांचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने गुरुवारी पर्दाफाश केला. ...
सांगली येथील भू-विकास बँकेच्या थकबाकीदार १ हजार ६७२ कर्जदारांसाठी सहकार विभागाने पुन्हा एकरकमी परतफेड योजना जाहीर केली असून याअंतर्गत १0९ कोटी रुपयांची माफी दिली जाणार आहे. योजना जाहीर करून, कारवाईचे इशारे देऊनही थकबाकीदारांनी बँकेला ठेंगा दाखविणे सु ...
कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज फाटा येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकून चोरट्यांची टोळी जेरबंद केली. एकूण चारजणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून १ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आणखी एक संशयित फरार असून त्या ...
राज्यातील अनेक जिल्हा बँका व खासगी बँकांना शासनाने यापूर्वीच अपलोड केलेले बहुतांश अर्ज अनसक्सेसचा शिक्का मारून पुन्हा अपलोडसाठी पाठविले आहेत. सांगली जिल्हा बँकेसह राज्यातील अनेक जिल्हा बँकांमधील अर्ज अपलोडची ही तिसरी फेरी सुरू झाली आहे. म्हणजेच शासन ...
अत्यंत चुरशीने झालेल्या राज्यस्तरीय शालेय सतरा वर्षाखालील बेसबॉल स्पर्धेत मुलांमध्ये कोल्हापूर विभागाने, तर मुलींत लातूर विभागाने विजेतेपद पटकावले. सांगलीतील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर हे सामने पार पडले. ...
दोन वर्षांपासून महापालिका हद्दीतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. दरवेळी पावसाळ्यानंतर रस्त्यांची कामे करण्याचे आश्वासन प्रशासन देते. मग आतापर्यंत रस्त्यांची कामे का झाली नाहीत? ही कामे कधी सुरू करणार? अशी प्रश्नांची सरबत्ती करीत काँग्रेस नेत्या जयश्र ...