बागणीत राजारामबापू कारखान्याकडून ऑक्सिजन यंत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:29 IST2021-05-27T04:29:07+5:302021-05-27T04:29:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बागणी : बागणी (ता. वाळवा) येथे राजारामबापू साखर कारखान्याकडून ऑक्सिजन मशीन, ऑक्सिमीटर, थर्मल स्कॅनर प्राथमिक केंद्राकडे ...

Oxygen machines from Rajarambapu factory in the garden | बागणीत राजारामबापू कारखान्याकडून ऑक्सिजन यंत्रे

बागणीत राजारामबापू कारखान्याकडून ऑक्सिजन यंत्रे

लोकमत न्यूज नेटवर्क

बागणी : बागणी (ता. वाळवा) येथे राजारामबापू साखर कारखान्याकडून ऑक्सिजन मशीन, ऑक्सिमीटर, थर्मल स्कॅनर प्राथमिक केंद्राकडे देण्यात आले.

बागणीमध्ये कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन पालकमंत्री जयंत पाटील यांनी आढावा बैठकीवेळी विलगीकरण व कोरोना सेंटर सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर राजारामबापू कारखान्याच्या माध्यमातून ऑक्सिजन मशीन, ऑक्सिमीटर, थर्मल स्कॅनर राष्ट्रवादीचे सरचिटणीस बाळासाहेब पाटील, वाळवा तालुकाध्यक्ष विजय पाटील व बागणीचे सरपंच संतोष घनवट यांच्या हस्ते प्राथमिक केंद्राकडे सुपूर्द करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी नाजमीन शिकलगार यांनी ते स्वीकारले. यावेळी जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील यांनी ३० बेड व इतर साहित्य लवकरच पाठविणार असल्याची माहिती दिली.

कारखान्याचे संचालक एल. बी. माळी, मार्केट कमिटीचे सभापती अल्लाऊद्दीन चौगले, उपसरपंच विष्णू किरतसिंग, ग्रामविकास अधिकारी नानासाहेब कारंडे, तंटामुक्तीचे अध्यक्ष डी. आर. पाटील, राजेंद्र पवार, सुभाष हवालदार उपस्थित होते.

Web Title: Oxygen machines from Rajarambapu factory in the garden