अंकली काेविड सेंटरला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:18 IST2021-06-10T04:18:26+5:302021-06-10T04:18:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शेती विकास संशोधन संस्था आणि पिरॅमल, मुंबई यांच्यातर्फे शबाना शेख यांच्या ...

अंकली काेविड सेंटरला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शेती विकास संशोधन संस्था आणि पिरॅमल, मुंबई यांच्यातर्फे शबाना शेख यांच्या सहकार्याने देण्यात आलेले तीन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर तहसीलदार डी. एस. कुंभार यांच्या हस्ते अंकली (ता. मिरज) येथील कोविड केअर सेंटरला सुपूर्द करण्यात आले. यावेळी डॉ. आंबेडकर संस्थेचे अमोल कदम, नीता आवळे यांनी संस्थेच्या कामाची माहिती दिली. यावेळी सरपंच काजल कोलप, राष्ट्र सेवा दलाचे किरण कांबळे, राज कांबळे, उपसरपंच माधुरी परिट, तलाठी संगीता पाटील, ग्रामसेवक बाबासाहेब नागरगोजे, पोलीसपाटील शिल्पा कोलप, ग्रामपंचायत सदस्य अभिजीत पाटील, निर्मला कांबळे, शीतल सुतार, अभिजीत जवळेकर, माजी सरपंच कीर्तीकुमार सावळवाडे, प्रदीप कांबळे, गजेंद्र कोलप, आशा सेविका सविता आरकेरी, विद्या परिट, वैशाली सूर्यवंशी, आरोग्यसेविका एस. पी. गोजारे, अनिता सूर्यवंशी, एस. बी. आंबी उपस्थित होते.