शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

५० हजारांच्या अनुदानापासून सांगली जिल्ह्यातील ६० हजारांवर शेतकरी राहणार वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 15:46 IST

जिल्ह्यातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक शेतकरी शासनाच्या एका चुकीमुळे अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

अविनाश कोळीसांगली : महात्मा फुले कर्जमाफी योजनेंतर्गत नियमित कर्ज परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा शासन निर्णय घेण्यात आला आहे. योजनेतील परतफेडीच्या तारखेच्या गोंधळाने जिल्ह्यातील ६० हजारांहून अधिक शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.जिल्हा बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकेच्या नियमित कर्जफेड करणाऱ्या जिल्ह्यातील सव्वालाख शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या मर्यादेत अनुदान मिळणार असून, सुमारे ६०० कोटीहून अधिक अनुदान मिळण्याचा प्राथमिक अंदाज आहे. तरीही जिल्ह्यातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक शेतकरी शासनाच्या एका चुकीमुळे अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

शासनाने कर्ज परतफेडीच्या दिलेल्या देय तारखा व धोरणानुसार बँकांनी दिलेल्या देय तारखांमध्ये मोठी तफावत आहे. २०१७ - १८ या वर्षात घेतलेले अल्प मुदत पीककर्ज ३० जून २०१८पर्यंत पूर्णत: परतफेड केलेले असल्यास, २०१८ - १९ या वर्षातील अल्पमुदत पीक कर्ज ३० जून २०१९ पर्यंत पूर्णत: परतफेड केले असल्यास तसेच २०१९ - २० या वर्षातील अल्पमुदत पीक कर्ज ३१ ऑगस्ट २०२०पर्यंत पूर्णत: परतफेड केले असल्यास अल्पमुदत पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यात येणार आहे.मात्र, कर्जवाटप धोरणाप्रमाणे १ जुलै २०१७ ते ३१ मार्च २०१८ पर्यंत उचल केलेल्या ऊस कर्जाची देय तारीख ३० जून २०१९, तर द्राक्षांसाठी १ जानेवारी २०१८ ते ३१ मार्च २०१८ या काळातील कर्जाची देय तारीख २६ एप्रिल २०१९ आहे. उसाकरिता १ जुलै २०१८ ते ३१ मार्च २०१९पर्यंत वाटप केलेल्या कर्जाची देय तारीख ३१ ऑगस्ट २०२० आहे. द्राक्ष पिकांच्या कर्जासाठीही हीच तारीख देय असते, अशा तिन्हीही आर्थिक वर्षातील प्रत्यक्षातील देय तारखा व शासनाने निश्चित केलेल्या तारखा वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करुनही ५० टक्क्यांहून अधिक शेतकरी या लाभापासून वंचित राहण्याची भीती आहे.

जिल्ह्यातील नियमित कर्जदार शेतकरीवर्ष             शेतकरी (लाखात)     कर्ज परतफेड (कोटीत)२०१७-१८    १.३०                   ५४८.२६२०१८-१९    १.१९                   ७७२.३१२०१९-२०    १                        ६६८.०७

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी