शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

..अन्यथा ठेकेदारांच्या आत्महत्या होतील, माजी मंत्री जयंत पाटील यांचे सूचक विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 18:57 IST

कुंडल : शासन कामांचे ठेके इतक्या चुकीच्या पद्धतीने आणि अंधाधुंद पद्धतीने ठेकेदारांना देत आहे की, आता या ठेक्यांचे पैसे ...

कुंडल : शासन कामांचे ठेके इतक्या चुकीच्या पद्धतीने आणि अंधाधुंद पद्धतीने ठेकेदारांना देत आहे की, आता या ठेक्यांचे पैसे देण्यास शासनाकडे पैसे नाहीत. हे पैसे जर ठेकेदारांना वेळेत दिले नाहीत तर आजवर शेतकऱ्यांच्या आत्महत्या जशा पहायला मिळत होत्या, तशा आता ठेकेदारांच्या आत्महत्या पहायला मिळण्याची शक्यता आहे, असे सूचक विधान माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी केले.ते कुंडल (ता. पलूस) येथे मामासाहेब पवार सत्यविजय बँकेचा षष्ट्याब्दीपूर्ती सोहळा, क्रांतिवीर दिवंगत आर. एस. ऊर्फ मामासाहेब पवार यांची ११०व्या जयंती व बँकेच्या नूतन इमारतीचा उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी आमदार विश्वजित कदम, समित कदम, मानसिंग नाईक, महेंद्र लाड, शरद लाड, प्रतीक पाटील, सुधीर जाधव, दिलीपराव नलावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी भारत नाईक आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते.जयंत पाटील म्हणाले, जागतिक पातळीवर रुपयाचे अवमूल्यांकन होत असताना आपली प्रगती वाढते आहे की, थांबली आहे, हे पाहावे लागेल. सामान्य नागरिक नेहमी कामात असताना ही आपल्या रुपयाचे अवमूल्यांकन होत असेल तर याला कारणीभूत कोण आणि त्याचा भुर्दंड कोणावर? रुपया घसरणे हे जगाच्या बाजारपेठेत चांगले लक्षण नाही.

लाडकी बहीण योजनेतून साडेपाच लाख भगिनींची नावे कमी केली. यासाठी आम्ही आता लाडक्या बहिणींच्या पाठीशी आहोत. किमान अजून कोणाची नावे कमी होऊ देऊ नका कारण त्यांनी मतदान केले आहे. झालेली चूक आता सुधारू नका असेही जयंत पाटील म्हणाले.

विश्वजित कदम म्हणाले, कुंडलच्या मातीत जादू आहे, येथे अनेक क्रांतिवीर जन्मले त्यामुळे ही माती इतिहासाच्या पानात सुवर्ण शब्दात उल्लेखित आहे. मामासाहेब पवार यांनी भविष्याचा वेध घेऊन उद्योग सुरू केले. औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्रात मामासाहेब नेहमी मदतीचा हात पुढे करत यातून अनेक व्यावसायिक या परिसरात घडले.बाळासाहेब पवार म्हणाले, प्रयागराजसारखा इथे ही जयंत पाटील, विश्वजित कदम आणि नेते मंडळी हा ही एक कुंभमेळा येथे जमला आहे. मार्चनंतर सभासदांना दहा टक्के लाभांश दिला जाईल. तसेच सहा टक्के बक्षीस म्हणून देण्याच्या विचाराधीन आहे.

टॅग्स :SangliसांगलीJayant Patilजयंत पाटीलMahayutiमहायुती