येडेनिपाणीचा आदर्श ठेवून नियोजन केल्यास इतर गावे कोरोनामुक्त होतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:35 IST2021-06-16T04:35:10+5:302021-06-16T04:35:10+5:30

कामेरी : येडेनिपाणी (ता. वाळवा) ग्रामपंचायतीने केलेल्या नियोजनाची इतर गावांनी अंमलबजावणी केल्यास ती गावे सुद्धा कोरोनामुक्त होतील, असा विश्वास ...

Other villages will be corona-free if the planning is done following the Yedenipani model | येडेनिपाणीचा आदर्श ठेवून नियोजन केल्यास इतर गावे कोरोनामुक्त होतील

येडेनिपाणीचा आदर्श ठेवून नियोजन केल्यास इतर गावे कोरोनामुक्त होतील

कामेरी : येडेनिपाणी (ता. वाळवा) ग्रामपंचायतीने केलेल्या नियोजनाची इतर गावांनी अंमलबजावणी केल्यास ती गावे सुद्धा कोरोनामुक्त होतील, असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी व्यक्त केला. या नियोजनाबद्दल येडेनिपाणी ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीचे त्यांनी अभिनंदन केले.

येडेनिपाणी ग्रामपंचायतीने काेराेनाबाधित व्यक्तींच्या संपर्कातील नागरिकांचा शाेध घेऊन जास्तीत जास्त कोरोना चाचण्या केल्या आहेत. गावांमध्ये विनाकारण कुणाला फिरू देत नाहीत, विलगीकरण केले जात आहे. बँक, डेअरी यांच्याबाबतीत काटेकोरपणे नियोजन केलेले आहे. मूलभूत वस्तुंचा पुरवठा प्रत्यक्ष घरापर्यंत केला जात आहे. त्यामुळे गावातील रुग्णसंख्या कमी होत आहे. याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी सरपंच, दक्षता समिती व आरोग्य विभागाचे अभिनंदन केले.

यावेळी तंटामुक्त अध्यक्ष एस. आर. पाटील, ग्रामपंचायत सदस्य इंद्रजित पाटील, उपसरपंच विनायक आलुगडे, बी. एन. पाटील, पोलिस पाटील बाबासाहेब गुरव, डॉ. ज्योती भाेईटे, आरोग्य सेविका मनीषा माने ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.

चौकट

येडेनिपाणीत आजअखेर २२८ कोरोनाबाधित आहेत. उपचार घेऊन १३२ जण काेराेनामुक्त झाले आहेत. सध्या ९४ रुग्ण उपचाराखाली आहेत, तर दोघांचा मृत्यू झाला आहे. साेमवारी दिवसभरात ८६ चाचण्या झाल्या. यामध्ये १५ जण बाधित आढळले आहेत.

Web Title: Other villages will be corona-free if the planning is done following the Yedenipani model

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.