शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम बनण्यासाठी सेंद्रिय शेतीस पर्याय नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:33 IST2021-02-17T04:33:02+5:302021-02-17T04:33:02+5:30
ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथे प्रकाश पाटील (दादा) यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयाेजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. वारणा सहकारी ...

शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम बनण्यासाठी सेंद्रिय शेतीस पर्याय नाही
ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथे प्रकाश पाटील (दादा) यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयाेजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. वारणा सहकारी बँकेचे अध्यक्ष निपुणराव कोरे अध्यक्षस्थानी होते. डॉ. माने म्हणाले, ग्रामीण भागातील शेतकरी हा अधिकाधिक उत्पन्न घेण्यासाठी प्रयत्नशील असून, शेतीसाठी लागणारी पर्यायी व्यवस्था तो शोधू लागला आहे. भविष्यात शेतीमध्ये उत्पन्नाचा चांगला स्रोत निर्माण होईल, असा आशावाद आहे.
निपुण कोरे म्हणाले, उत्तम आरोग्य व सहकार टिकवण्यासाठी सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही.
फत्तेसिंगराव नाईक सहकारी दूध संघाचे अध्यक्ष अमरसिंह नाईक म्हणाले, सेंद्रीय शेतीबरोबरच शेतीला जोडव्यवसाय असल्यास शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होऊ शकते व त्यातून शेतकरी आर्थिकदृष्ट्या प्रबळ बनू शकतो.
पश्चिम महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष डॉ. प्रताप पाटील म्हणाले, शेती उत्तम पिकविण्यासाठी संयम, योग्य नियोजन असेल, तर शेतकरी हा आर्थिकदृष्ट्या प्रबळ बनू शकतो.
यावेळी पाेखर्णीचे डॉ. सतीश पाटील, वारणा दूध संघाचे नूतन संचालक व्ही. टी. पाटील, अभिजित पाटील, लालासाहेब पाटील, अध्यक्ष बादशा नदाफ आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सूरज चौगुले यांनी केले, तर रोहित पाटील यांनी आभार मानले.
फोटो :
ओळ : ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथील शेतकरी मेळाव्यात कृषिभूषण डॉ. संजीव माने यांनी मार्गदर्शन केले.