शहरातील मोकाट कुत्री पकडण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:42 IST2020-12-12T04:42:30+5:302020-12-12T04:42:30+5:30

सांगली : नागरिक, बालकांवर हल्ले झालेल्या परिसरातील मोकाट कुत्री तातडीने पकडण्याचे आदेश उपायुक्त राहुल रोकडे यांनी शुक्रवारी दिले. याबाबत ...

Orders to catch Mokat dogs in the city | शहरातील मोकाट कुत्री पकडण्याचे आदेश

शहरातील मोकाट कुत्री पकडण्याचे आदेश

सांगली : नागरिक, बालकांवर हल्ले झालेल्या परिसरातील मोकाट कुत्री तातडीने पकडण्याचे आदेश उपायुक्त राहुल रोकडे यांनी शुक्रवारी दिले. याबाबत त्यांनी आरोग्य विभागाची बैठकही घेतली.

‘शहरात मोकाट कुत्री सुसाट’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. मोकाट कुत्र्यांनी आतापर्यंत ५० हून अधिक नागरिकांवर हल्ले केले आहेत. किरकोळ अपघाताचे प्रमाण वाढल्याचेही प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. या वृत्ताची दखल घेत आयुक्त नितीन कापडणीस यांनी उपायुक्तांना तातडीने बैठक घेऊन आढावा घेण्याची सूचना केली होती.

शुक्रवारी उपायुक्त दालनात बैठक झाली. या बैठकीला आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र ताटे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, डॉग व्हॅन विभागाचे सिद्धार्थ कांबळे, आप्पा शिकलगार उपस्थित होते. यावेळी महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांची उत्पत्ती थांबावी, यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना उपायुक्तांनी केली. याचबरोबर नागरिक व बालकांवर हल्ले झालेल्या परिसरातील मोकाट कुत्री तातडीने पकडण्याबरोबर या मोहिमेत सातत्य ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिले.

Web Title: Orders to catch Mokat dogs in the city