शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: मोरणा धरणात अवघा ९ टक्के पाणीसाठा, शिराळा शहरावर पाणीटंचाईचे सावट

By संतोष भिसे | Updated: May 11, 2024 16:04 IST

उद्योगांसाठी वापर वाढला, शेती व पिण्यासाठी आरक्षणाची मागणी

विकास शहाशिराळा : शिराळा शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या मोरणा धरणातीलपाणीसाठा फक्त अवघा ९ टक्के शिल्लक आहे. त्यामुळे शहरास काही दिवसांनी पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. पिण्यासाठी व शेतीसाठी प्रामुख्याने पाणी देणे आवश्यक आहे; मात्र औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. वाकुर्डे योजनेचे पाणी तातडीने न सोडल्यास शिराळ्यासह अनेक गावांचा पिण्याच्या व शेतीसाठी पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.वाकुर्डे योजनेचे पाणी मोरणा धरणात ३ मार्च रोजी सोडले होते. त्यावेळी फक्त ४ टक्केच पाणीसाठा वाढला होता. याचा फारसा परिणाम पाणीसाठ्यावर झाला नव्हता. सध्या धरणात २९ टक्के पाणीसाठा असून उपयुक्त पाणीसाठा फक्त ९ टक्केच आहे. धरणातून मोरणा नदीत सोडण्यात येणाऱ्या मुख्य दरवाज्याच्या काढण्यात आलेल्या चाचीमध्ये गाळ साचल्यामुळे २९ एप्रिलमध्ये सोडलेले पाणी कमी दाबाने आल्यामुळे शेतीला पाणी अपुरे पडले होते.आता सोडण्यात येणाऱ्या आवर्तनावेळी पाणी मिळेल का नाही, अशी अवस्था आहे. पाणी नाही सोडले तर धरणापासून ते मांगलेपर्यंत शेती व पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागेल. या धरणातून नदीत पाच दिवस पाणी सोडण्यात येते. तर दहा दिवस बंद व जलाशयात ५ दिवस उपसा व १० दिवस उपसाबंदी असे नियोजन आहे. धरणातील पाण्यावर पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी २० गावे व प्रामुख्याने शिराळा शहराला व एम.आय.डी.सी. पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. मोरणा धरणाच्या क्षमतेपेक्षा दुप्पट पाणी वापरात येणारा राज्यातील एकमेव मध्यम प्रकल्प आहे. शासनाच्या नियमानुसार वीजबिले आजअखेर शेतकऱ्यांनी भरली असतानाही आमची अवस्था अशी का? असा सवाल शेतकरी करीत आहेत.

धरणाच्या लाभक्षेत्रातील गावेजलाशयातील : शिराळा, एमआयडीसी तडवळे, उपवळे, अंत्री खुर्द, अंत्री बुद्रुक, पाडळी, पाडळेवाडीधरणाखालील : बिऊर, भाटशिरगाव, शिंगटेवाडी, जांभळेवाडी, धुमाळवाडी, चिखलवाडी, फकीरवाडी, इंग्रुळ, मांगले व शिराळ्याचा काही भाग.

टॅग्स :SangliसांगलीDamधरणWaterपाणीdroughtदुष्काळshirala-acशिराळा