कोरोना लसीचे अवघे २० हजार डोस मिळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:35 IST2021-04-30T04:35:06+5:302021-04-30T04:35:06+5:30
जिल्ह्याला लसीचा पुरेसा पुरवठा गुरुवारीदेखील होऊ शकला नाही. मंगळवारी लस संपल्याने बुधवारी लसीकरण बंद राहिले होते. गुरुवारी किमान ५० ...

कोरोना लसीचे अवघे २० हजार डोस मिळाले
जिल्ह्याला लसीचा पुरेसा पुरवठा गुरुवारीदेखील होऊ शकला नाही. मंगळवारी लस संपल्याने बुधवारी लसीकरण बंद राहिले होते. गुरुवारी किमान ५० हजार डोस मिळतील व त्यातून दोन दिवस लसीकरण चालेल, अशी अपेक्षा होती. पुण्यातून लस देण्यासाठी निरोप मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने व्हॅन पाठविली; पण अवघ्या २० हजार डोससह ती परतली. दुपारी लस प्राप्त झाल्यावर त्यातील तीन हजार डोस महापालिकेला देण्यात आले. उर्वरित लसीचे जिल्हाभरात वितरण झाले. त्यामुळे दुपारनंतर काही मोजक्याच केंद्रांवर लसीकरण सुरू झाले. जिल्हा प्रशासनाकडून दुसऱ्या डोसला प्राधान्य देण्यात येत आहे.
गुरुवारी दिवसभरात फक्त १ हजार ६८५ नागरिकांना लस मिळू शकली. शुक्रवारी आणखी काही डोस मिळण्याची शक्यता आहे.
चौकट
गुरुवारी दिवसभरात लसीकरण असे
ग्रामीण भागात - ५५३
निमशहरी भागात - १८७
महापालिका क्षेत्रात - १७९
खासगी रुग्णालयांत - ७६६
गुरुवारी एकूण - १,६८५
आजवर एकूण - ५,३९,५३०