शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

दर उतरल्यामुळे रस्त्यावर फेकले कांदे, सांगलीत शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन 

By अशोक डोंबाळे | Updated: October 24, 2024 16:52 IST

सांगली : सध्या कांद्याला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये गेले काही दिवस आनंदाचे वातावरण होते. पण त्यांचा आनंद व्यापाऱ्यांनी ...

सांगली : सध्या कांद्याला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये गेले काही दिवस आनंदाचे वातावरण होते. पण त्यांचा आनंद व्यापाऱ्यांनी जास्त काळ टिकू दिला नाही. सांगलीच्या विष्णूअण्णा पाटील फळे मार्केटमध्ये कांद्याची जादा आवक होताच दर पाच हजार रूपये प्रति क्विंटलवरून हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत गडगडला आहे. त्यामुळे शेतकरी चांगलेच संतप्त बनले. विक्रीस आणलेला कांदा चक्क रस्त्यावर उधळला. सांगली-कोल्हापूर रस्त्यावर रास्ता रोको केला.येथील कोल्हापूर रस्त्यावरील मार्केटमध्ये वेगवेगळ्या भागातील शेतकऱ्यांनी कांदा आणला होता. गेले काही दिवस चांगला दर असल्यामुळे गुरूवारी देखील चांगला दर मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु आवक जास्त झाल्यामुळे दर गडगडला. शेतकऱ्यांनी कांद्याच्या दराची ही कमालीची घसरण पाहून संताप व्यक्त करण्यास सुरूवात केली. कांदा उत्पादक शेतकरी एकवटले. त्यांनी सौदे बंद करून आणलेला कांदा रस्त्यावर फेकून देऊन संताप व्यक्त केला. तसेच रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे गोंधळ उडाला. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान जोपर्यंत कांद्याला कालपर्यंत असणारा साडेचार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटल दर द्यायला व्यापारी तयार होत नाहीत, तोपर्यंत बाजार समितीत कुठलाही सौदा होऊ देणार नाही, असा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीagitationआंदोलन