शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

किरकोळ कारणातून दोघा ट्रकचालकांच्या भांडणात एकाचा खून, सांगलीतील राजेवाडीत घडली घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 13:46 IST

रागाच्या भरात ट्रकमध्ये असलेल्या लोखंडी टॉमीने डोक्यात हल्ला केला. वर्मी घाव बसल्याने जागीच मृत्यू झाला.

आटपाडी : राजेवाडी (ता. आटपाडी) येथील हिंगणी रस्त्यावर असलेल्या वीटभट्टीवर दगडी कोळशाची राख घेऊन आलेल्या दोन ट्रकचालकांमध्ये किरकोळ वादातून हाणामारी झाली. यावेळी एकाने टॉमी घेऊन डोक्यात हल्ला केल्याने दुसऱ्या चालकाचा जागीच मृत्यू झाला. हणमंत लक्ष्मण नागरगोजे (वय ३३, रा. धानोरा, ता. लोहा, जि. नांदेड) असे मृताचे, तर गणेश उत्तमराव मुंगल (२९, रा. खैरगाव, ता. अर्धापूर, जि. नांदेड) असे हल्लेखोराचे नाव आहे. रविवार, दि. २० रोजी रात्री ११ वाजता ही घटना घडली. आटपाडी पोलिसांनी हल्लेखोर गणेश मुंगल याला अटक केली आहे.राजेवाडी येथील हिंगणी रस्त्यावर चंद्रकांत तुकाराम भोसले यांची वीटभट्टी आहे. या वीटभट्टीसाठी लागणारी दगडी कोळशाची राख घेऊन नांदेड जिल्ह्यातून आलेल्या ट्रकवर (क्र. एमएच २६ बीई ४४७६) चालक म्हणून गणेश मुंगल व हणमंत नागरगोजे हे दोघे आले होते. रविवारी रात्री पावणेअकरा वाजण्याच्यासुमारास दोघांमध्ये भांडण सुरू झाले. या भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी चालक गणेश मुंगल याने रागाच्या भरात ट्रकमध्ये असलेल्या लोखंडी टॉमीने हणमंत नागरगोजे याच्या डोक्यात हल्ला केला. वर्मी घाव बसल्याने हणमंतचा जागीच मृत्यू झाला.याबाबत वीटभट्टीचालक चंद्रकांत तुकाराम भोसले यांनी आटपाडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश मुंगले याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. अधिक तपास पोलीस निरीक्षक शरद मेमाणे करत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस