इनामधामणीत एकास चाकूने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:26 IST2021-05-13T04:26:42+5:302021-05-13T04:26:42+5:30

सांगली : इनामधामणी (ता. मिरज) येथे उसने दिलेले पैसे परत मागण्यासाठी गेलेल्या एकावर चाकूने वार करून त्यास जखमी करण्यात ...

One person was stabbed in Inamdhamani | इनामधामणीत एकास चाकूने मारहाण

इनामधामणीत एकास चाकूने मारहाण

सांगली : इनामधामणी (ता. मिरज) येथे उसने दिलेले पैसे परत मागण्यासाठी गेलेल्या एकावर चाकूने वार करून त्यास जखमी करण्यात आले. विजय वसंत चव्हाण (वय ३७, रा. पुनदी, ता. पलूस) असे जखमीचे नाव असून, त्यांनी राहुल सुरेश कागले (रा. इनामधामणी) याच्याविरोधात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मंगळवार दि. ११ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास फिर्यादी विजय हे हातउसने दिलेले पैसे मागण्यासाठी राहुलच्या घरी गेले होते. यावेळी संशयित राहुलने मी पैसे देत नाही काय करायचे ते कर, म्हणून दमदाटी व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने हातातील चाकूने विजयच्या हातावर चाकू मारून त्यांना जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार सांगली ग्रामीण पोलिसांत संशयित राहुल कागले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: One person was stabbed in Inamdhamani