शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

चिंताजनक! सांगली जिल्ह्यात १६ तासांत एकाचा जातोय बळी, रस्ता सुरक्षा अभियानानंतरही अपघातांची मालिका

By घनशाम नवाथे | Updated: June 27, 2025 16:49 IST

२० तासांवरून १६ तासांवर प्रमाण

घनशाम नवाथे सांगली : रस्ता सुरक्षा अभियान हे केवळ महिन्यापुरते नव्हे, तर कायमस्वरूपी राबविण्याची गरज बनली आहे. कारण, गेल्या पाच महिन्यांत तब्बल २३५ जणांचा अपघाती बळी गेला आहे. गतवर्षीपर्यंत जिल्ह्यात दर २० तासांत एक अपघाती बळी जात होता. आता दर १६ तासांत एकाचा अपघाती मृत्यू होत असून, हे चित्र चिंता करायला लावणारे आहे.रस्ते अपघात हा सध्या चिंताजनक विषय बनला आहे. कारण, अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रस्ता सुरक्षा अभियान जानेवारी महिन्यात राबविण्यात आले. अपघात टाळण्यासाठी जनजागृती करण्यात आली. परंतु अपघातांचे प्रमाण काही कमी झाले नाही. अभियानात जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अपघातांच्या वाढत्या प्रमाणाबाबत चिंता व्यक्त केली होती. अभियान वर्षभर राबवले जाऊन ती चळवळ बनायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली.दहा वर्षांपूर्वीपर्यंत अपघाताच्या प्रमुख कारणांचा शोध घेताना ‘ब्लॅक स्पॉट’ अर्थात वारंवार अपघात होणाऱ्या ठिकाणीच अपघातांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले. न्यायालयाच्या निर्देशानुसार वारंवार अपघात होणारे ‘ब्लॅक स्पॉट’ नष्ट करण्यात आले आहेत. जिल्ह्यात जवळपास ६५ हून अधिक ‘ब्लॅक स्पॉट’ होते. सध्या बोटावर मोजण्याइतपत ही ठिकाणे आहेत. तीदेखील नष्ट केली जात आहेत.अलिकडे ‘ब्लॅक स्पॉट’ ऐवजी वाहन चालकांचा बेदरकारपणा अपघातास जास्त कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येत आहे. खराब रस्ते, धोकादायक वळण, चढ-उतार, अरुंद रस्ता, अशा ठिकाणचे अपघात कमी झाले आहेत. राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी अपघात होताना दिसत आहेत. तसेच राज्य मार्ग, जिल्हा मार्ग तसेच शहरातदेखील अपघात होत आहेत. त्यामध्ये प्रमुख कारण बेदरकारपणा, वेगावर नियंत्रण नसणे हेच दिसून येते. अपघाताला मानवी चुकाच जास्त कारणीभूत ठरत आहेत.

अपघाताची प्रमुख कारणे

  • भरधाव वेगाने वाहन चालवणे.
  • धोकादायक वाहन चालवणे.
  • दारू पिऊन वाहन चालवणे.
  • चुकीचे ओव्हरटेक करणे.
  • हेल्मेट न घालणे.

अपघाती बळी वाढू लागलेवर्ष -  मृत्यूमुखी२०२१ - ३१७२०२२ - ३७३२०२३ - ३४४२०२४ - ४४९२०२५ - २३५(मे अखेर) 

अभिनयान नव्हे, चळवळ हवीअपघाताचे वाढते प्रमाण पाहता रस्ता सुरक्षा अभियान केवळ एक महिन्यापुरते नव्हे, तर कायमस्वरूपी चळवळ म्हणून राबविण्याची गरज आहे. तरच वाहन चालकांमध्ये जागृती होऊन अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकेल.

वाहतूक नियमांचे पालन हवेदुचाकी चालवताना हेल्मेट घालणे. चारचाकीमध्ये सीटबेल्टचा वापर करणे. महामार्गावर दिलेल्या वेग मर्यादेचे पालन करणे. दारूच्या नशेत वाहन न चालवणे. नादुरुस्त वाहन न चालवणे. ट्रिपल सीट दुचाकी न चालवणे. वाहन चालवताना मोबाइलवर न बोलणे आदी नियमांचे पालन करावे.

२० तासांवरून १६ तासांवर प्रमाणजिल्ह्यात गतवर्षीपर्यंत दर २० तासांत एकाचा अपघाती बळी जात होता. परंतु अपघाती बळींची संख्या वाढली असून, सध्या १६ तासांत एकाचा अपघाती मृत्यू होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होऊ लागली आहे.