शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: उसाची ट्रॉलीखाली सापडून एकाचा जागीच मृत्यू, प्रसंगावधान राखून चार मुलींना वाचवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 11:48 IST

हा प्रकार पाहून भेदरलेल्या मुलींनी आरडाओरड केला

सांगली : कर्नाळ ते सांगली रस्त्यावर उसाच्या ट्रॉलीची पीन निसटून ट्रॉली वेगाने मागे येऊन शाळकरी मुलींना घेऊन घराकडे चालत निघालेल्या अभिजीत निवृत्ती पाटील (वय ४२, रा. सांगली रस्ता, कर्नाळ, ता.मिरज) यांच्या डोक्यावरून चाक गेल्याने ते जागीच ठार झाले. त्यांच्यासोबत घराकडे निघालेली मुलगी, शेजारील तीन मुलींना त्यांनी प्रसंंगावधान राखून बाजूला ढकलले. त्यामुळे चौघी जणी बचावल्या. थरकाप उडविणाऱ्या अपघातात अभिजीत यांचा मृत्यू झाल्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.अभिजीत पाटील हे हॉटेलमध्ये मदतनीस म्हणून काम करत होते. पत्नी, दोन मुली, आई-वडिलांसह ते सांगली रस्त्यावर राहत होते, तर भाऊ पुण्यात नोकरीस आहे. अभिजीत हे सायंकाळी कर्नाळ हायस्कूल, कर्नाळमध्ये शिकणाऱ्या त्यांच्या मुलीला व शेजारील तीन मुलींना घेऊन चालत नेहमी घरी आणत होते. बुधवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास ते मुलीला व शेजारील तीन मुलींना घेऊन घरी येत होते. कर्नाळमधील खणीपासून ते सांगलीच्या दिशेने येत असताना त्यांनी मुलीचे दप्तर, डब्याची पिशवी स्वत:कडे घेतली होती. चारही शाळकरी मुली त्यांच्या डाव्या बाजूला बाजूपट्टीवरून चालत होत्या. त्याच वेळी सांगलीकडे निघालेल्या उसाच्या ट्रॅक्टर, ट्रॉलीपैकी मागील ट्रॉलीची पीन निघाली. त्यामुळे ट्रॉली पुढच्या ट्रॉलीपासून वेगळी होऊन वेगाने मागे आली. चालत निघालेल्या अभिजीत मागे येणारी ट्रॉली पाहून तत्काळ धोका लक्षात आला. त्यांनी मुलींच्या अंगावर ट्रॉली येऊ नये, म्हणून त्यांना बाजूला ढकलले, परंतू या प्रयत्नात ट्रॉलीची धडक बसल्यानंतर चाक त्यांच्या डोक्यावरून गेले. त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार पाहून भेदरलेल्या मुलींनी आरडाओरड केला. रस्त्यावरील नागरिक तत्काळ धावले. तोपर्यंत अभिजीत यांचा जागीच मृत्यू झाला होता. अपघातानंतर घटनास्थळी गर्दी जमली होती. सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण चौगले यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.कर्नाळ परिसरात हळहळअभिजीत पाटील यांना चार शाळकरी मुलींना वाचविताना स्वत:चा जीव गमवावा लागला. या अपघातानंतर घटनास्थळी गर्दी जमली होती. अभिजीत यांच्या अपघाती मृत्यूबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचे वडील निवृत्त मुख्याध्यापक आहेत.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यू