शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

काँग्रेसने लोकसभेला कमावले, विधानसभेला गमावले; सांगली जिल्ह्यात दोन जागा गमावल्या, नेमकं काय चुकले..वाचा

By अशोक डोंबाळे | Updated: November 24, 2024 17:02 IST

सांगली जिल्ह्यात दोन जागा गमावल्या 

अशोक डोंबाळेसांगली : काँग्रेसच्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत एकसंधपणा दाखविल्याने खासदार विशाल पाटील यांची बंडखोरी यशस्वी झाली. पण, लोकसभा निवडणुकीतील एकी काँग्रेस नेत्यांना विधानसभा निवडणुकीत दाखविता आली नाही. त्यामुळे काँग्रेसच्या हक्काच्या सांगली व जत यादोन जागा गमवाव्या लागल्या. घराणेशाहीचा मुद्दा या निवडणुकीत मतदारांनी झिडकारल्याचे दिसून आले.लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांनी एकसंधपणा दाखविल्यामुळे ग्रामीण भागातील कार्यकर्ते रिचार्ज झाले. कार्यकर्त्यांनी पदरमोड करून पक्षाचा प्रचार करून भरभरून मतांची शिदोरी काँग्रेस अपक्षांच्या पारड्यात टाकले. खानापूर, पलूस-कडेगाव, तासगाव-कवठेमहांकाळ, मिरज, सांगली या पाच विधानसभा मतदारसंघात खासदार विशाल पाटील यांना मताधिक्य मिळाले होते. केवळ जत विधानसभा मतदारसंघात भाजपला सहा हजार २७१ मतांची आघाडी मिळाली होती.लोकसभा निवडणुका होऊन सहा महिने पूर्ण होण्यापूर्वीच काँग्रेसच्या नेत्यांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली. खासदार विशाल पाटील हे अपक्ष म्हणून निवडून आले असले तरी त्यानंतर त्यांनी काँग्रेसचे सहयोगी सदस्यत्व घेतले होते. त्यामुळे विशाल पाटील आणि डॉ. विश्वजित कदम यांनी जिल्ह्यातील नेत्यांमधील संघर्ष संपवून त्यांना एकत्र आणण्याची गरज होती. पण, काँग्रेसची एकी करण्याऐवजी डॉ. विश्वजित कदम यांनी स्वत:च्या पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाकडे लक्ष केंद्रित केले.अर्थात भाजपचे उमेदवार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी त्यांच्यासमोर तगडे आव्हान उभा केले होते. खासदार विशाल पाटील यांनी सांगलीतील काँग्रेसमधील वाद मिटविण्याऐवजी दादा घराण्याचा मुद्दा उपस्थित करून फुटीला खतपाणीच घातले. सांगलीतील काँग्रेसच्या वादाचे पडसाद जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात उमटले. नेत्यांच्या भूमिकेवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करून पक्षापासून फारकत घेतली. म्हणूनच २०१९ मध्ये काँग्रेस पक्षाला मिळालेल्या मताची आकडेवारी उमेदवारांना टिकविता आली नाही.

जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची फरपट..सांगलीतून भाजपचे सुधीर गाडगीळ मागील निवडणुकीत सहा हजार मताधिक्याने विजयी झाले होते; पण, २०२४ च्या निवडणुकीत त्यांना ३६ हजार १३५ मतांची आघाडी मिळाली. जतमध्येही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत यांचाही ३७ हजार १०३ मताने पराभव झाला. केवळ काँग्रेस नेत्यांची एकजूट नसल्यामुळे लोकसभा निवडणुकीतील यशानंतर विधानसभेला बेरीज होण्याऐवजी वजाबाकीच झाली. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसचे नेते आत्मचिंतन करून आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीपूर्वी संघर्ष संपवून नव्याने पक्षबांधणी करणार की नाही, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. नेत्यांनी संघर्ष थांबविला नाही, तर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची फरपट होणार आहे.

काँग्रेसचे आणखी काय चुकले?

  • ओबीसी, दलित समाजाची एकसंधपण बांधणी करण्याकडे नेत्यांचे दुर्लक्ष
  • काँग्रेस पक्षबांधणीकडे लक्ष देण्याऐवजी गट-तट वाढविण्यात नेते व्यस्त.
  • गावपातळीवर पक्ष बांधणीकडे दुर्लक्ष.
  • अंतर्गत वादात मतदारापर्यंत पोहोचण्यात यश.
  • भाजपविरोधात भूमिका मांडण्याऐवजी एकमेकांवर टीकास्त्रात व्यस्त.
  • निवडणुका आल्यानंतरच कार्यकर्त्यांची नेत्यांना आठवण.
टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024sangli-acसांगलीcongressकाँग्रेसwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024