शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Crime: क्रिप्टोकरन्सी प्रकरणातील एकास अटक, कोट्यवधींची फसवणूक; संशयित दाम्पत्य अद्याप पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 17:48 IST

क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून तीन महिन्यांत दुप्पट रक्कम देण्याचे दिले होते आमिष

सांगली : आर्थिक गुन्हे शाखेने क्रिप्टोकरन्सी फसवणूकप्रकरणी एका संशयिताला अटक केली. अब्दुल महंमदसाब इनामदार (छलवादे गल्ली, गुरुवार पेठ, मिरज) असे त्याचे नाव आहे. संशयितास मंगळवार ३१ रोजी न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित डॉ. इब्राहिम महंमदसाब इनामदार, त्याची पत्नी जस्मीन इब्राहिम इनामदार तीन महिन्यांपासून अद्याप पसार असून त्यांचा शोध सुरू आहे.फिर्यादी सादिक यासीन कोचरगी (शहापूर, इचलकरंजी) यांचा यंत्रमाग व्यवसाय आहे. शेजारील लतीफ मुल्ला, त्यांचा मुलगा ओसामा यांची ओळख होती. जानेवारी २०२२ मध्ये संशयित जस्मीन इनामदार, डॉ. इब्राहिम इनामदार व अब्दुल इनामदार यांच्याशी मुल्लांनी ओळख करून दिली. संशयितांनी कोचरगी यांना क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून तीन महिन्यांत दुप्पट रक्कम देतो, असे सांगितले.

त्यांच्यावर विश्वास ठेवून फिर्यादी कोचरगी यांनी बारा लाख, तर नईम जंगले यांचे १३ लाख, बंदेनवाज मुजावर यांचे १४ लाख, संभाजी जाधव यांचे २२ लाख अशी एकत्रित ६१ लाखांची गुंतवणूक केली. फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर गुन्हा नोंद झाला. पोलिसांनी संशयितांच्या घरावर छापे टाकले, आलिशान गाडी जप्त केली. काही महत्त्वाची कागदपत्रे व रोकडही जप्त केली. आता त्यांची बँक खाती गोठवण्यात आलीत. अन्य मालमत्तांचा शोधही घेतला जात आहे.दरम्यान, लतीफ मुल्ला यांच्यासह आणखी तिघांचे तक्रारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्याची पडताळणी करून ते दाखल करण्यात आले. कोट्यवधींची फसवणूक झाल्याची तक्रार तिघांनी नोंदवली आहे. त्यानंतर सोमवारी एकास अटक करण्यात आली. क्रिप्टोकरन्सीद्वारे फसवणूक झालेल्यांनी आर्थिक गुन्हे शाखेशी तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसfraudधोकेबाजी