शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

Sangli: किरकोळ कारणातून रामापूरच्या एकाचा शिरगाव फाट्यावर खून, संशयित पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 17:43 IST

वांगी : शिरगांव फाटा (ता.कडेगाव) येथे हॉटेलमध्ये बसल्यानंतर, किरकोळ कारणातून सुरेश राजाराम पाटील (वय ५४ रा.रामापूर, ता.कडेगाव) यांना लाथा-बुक्क्यांनी ...

वांगी : शिरगांव फाटा (ता.कडेगाव) येथे हॉटेलमध्ये बसल्यानंतर, किरकोळ कारणातून सुरेश राजाराम पाटील (वय ५४ रा.रामापूर, ता.कडेगाव) यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून, जमिनीवर डोके आपटण्यात आले. गंभीर जखमी सुरेश पाटील यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी संशयित रोहित आनंद माळी (वय ३०, रा.रामापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, तो पसार झाला आहे.याबाबत चिंचणी-वांगी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वांगीपासून दक्षिणेला ३ किमी अंतरावर जुना सांगली- सातारा रस्त्यावर असणाऱ्या शिरगाव फाटा (ता.कडेगाव) येथे शनिवार, दि. १९ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हॉटेल स्वामी समर्थमध्ये सुरेश पाटील बसले होते. त्यावेळी संशयित रोहित माळी हा येऊन बसला. तेव्हा पाटील आणि रोहित माळी यांच्यात शाब्दिक वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. रोहित याने पाटील यांना लाथा-बुक्क्यांनी जोरदार मारहाण केली. त्यानंतर, पाटील यांना हॉटेलबाहेर काढून रस्त्यावर लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत, त्यांचे डोके जमिनीवर आपटून गंभीर जखमी केली. मारहाणीनंतर रोहितने पलायन केले. जखमी सुरेश पाटील यांना कराड येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. सोमवार, दि. २१ रोजी सुरेश पाटील यांचे उपचारादरम्यान निधन झाले. मृत सुरेश पाटील यांचे भाऊ महादेव राजाराम पाटील यांनी चिंचणी-वांगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, रोहित याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तो पसार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे.घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी पद्मा कदम यांनी भेट दिली. सहायक पोलिस निरीक्षक संदीप साळुंखे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस