शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: जतमध्ये भरदिवसा कौटुंबिक वादातून एकाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 17:05 IST

जत : जत येथील विजापूर-सातारा रस्त्यावरील सोलनकर चौकात भरदुपारी एक वाजता अविनाश बाळू कांबळे (वय ३०, रा. जत) याचा ...

जत : जत येथील विजापूर-सातारा रस्त्यावरील सोलनकर चौकात भरदुपारी एक वाजता अविनाश बाळू कांबळे (वय ३०, रा. जत) याचा धारदार कोयत्याने हल्ला करून खून करण्यात आला. याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात चार संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, हा खून कौटुंबिक वादातून झाला असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी संशयित आरोपी किशोर नारायण बामणे (वय २५, रा. जत) याच्यासह साथीदार सोनू ऊर्फ महांतेश मुकेश सनके, विजय महेंद्र कांबळे, आनंद ईश्वर कांबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हल्ला करून खून केल्यानंतर संशयित किशोर बामणे हा पसार झाला, तर जत पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित किशोर बामणे याच्या बहिणीचा विवाह जत येथेच विठ्ठलनगरातील मृत अविनाश याच्या भावाबरोबर झाला होता. मृत अविनाश याच्या भावाने पाच वर्षांपूर्वी गळफास लावून घेऊन आत्महत्या केली होती, तसेच आई-वडीलही याअगोदरच मृत झाले आहेत. मृत अविनाश हा दारू पिऊन किशोर याच्या विधवा बहिणीस जागेच्या वादातून त्रास देत होता. हा प्रकार समजताच किशोर याने अविनाश यास ताकीद दिली होती. मात्र, तरीही तो बहिणीला त्रास देत असल्याने कायमचे संपवायचे म्हणून सोलनकर चौकात भरदिवसा गजबजलेल्या ठिकाणी कोयत्याने हल्ला करून खून केला.नगरसेवक विजय ताड यांचाही खून दिवसा ढवळ्या गोळीबार करून तोंडावर दगड फेकून खून करण्यात आला होता. दिवसाढवळ्यात झालेल्या खुनाच्या घटनेमुळे जत शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खुनाच्या घटनेची माहिती संपूर्ण तालुकाभर वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे घटनास्थळी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. घटनास्थळी तातडीने पोलिस फौजफाटा दाखल झाला. उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे यांनी भेट दिली.खुनाचे कारण स्पष्ट झाले झाले असून, कौटुंबिक वादातूनच घटना घडली आहे. याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात मृत अविनाश याची बहीण नीलम दशरथ पवार (रा. म्हैसाळ) हिने फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक विक्रांत बोदे करीत आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीjat-acजाटCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस