भवानीनगरजवळ मोटारीच्या धडकेत एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:24 IST2021-04-14T04:24:44+5:302021-04-14T04:24:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : भवानीनगर (ता.वाळवा) गावच्या हद्दीत सहा दिवसांपूर्वी मोटारीची धडक बसून झालेल्या अपघातात एक जण जागीच ...

One killed in car crash near Bhavnagar | भवानीनगरजवळ मोटारीच्या धडकेत एक ठार

भवानीनगरजवळ मोटारीच्या धडकेत एक ठार

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : भवानीनगर (ता.वाळवा) गावच्या हद्दीत सहा दिवसांपूर्वी मोटारीची धडक बसून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. संदीप जयसिंग पाटील (वय ३३, रा.येडेमच्छिंद्र) असे मृताचे नाव आहे. या अपघातप्रकरणी मंगळवारी गुन्हा नोंद करण्यात आला.

कराड-तासगाव रस्त्यावर भवानीनगरच्या हद्दीत ८ एप्रिल रोजी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास हा अपघात झाला होता. मृत संदीप पाटील दुचाकीवरून (क्र. एमएच १० बीपी ९३८८) निघाला होता. यावेळी भरधाव वेगाने आलेल्या मोटारीची (क्र. एमएच १४ ईसी ४५९९) पाटील याच्या दुचाकीला जोराची धडक बसली. यामध्ये संदीपच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली होती. त्याला उपचारापूर्वी दाखल करण्यापूर्वीच त्याचे निधन झाले होते. याबाबत पोलीस हवालदार उत्तम तुकाराम माळी यांनी मोटारीवरील अज्ञात चालकाविरुद्ध अपघात करून संदीप पाटील याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याची फिर्याद दिली आहे.

Web Title: One killed in car crash near Bhavnagar