बस्तवडेतील भीषण स्फोटात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:20 IST2020-12-07T04:20:46+5:302020-12-07T04:20:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तासगाव : बस्तवडे (ता. तासगाव) येथे ब्लास्टिंगसाठी आलेल्या दाेन वाहनांचा स्फोट झाल्यामुळे तासगाव तालुका हादरला. या ...

बस्तवडेतील भीषण स्फोटात एक ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
तासगाव : बस्तवडे (ता. तासगाव) येथे ब्लास्टिंगसाठी आलेल्या दाेन वाहनांचा स्फोट झाल्यामुळे तासगाव तालुका हादरला. या भीषण स्फोटात एक ठार, तर दाेघे जखमी झाले आहेत. ब्लास्टिंग यंत्र असलेले दाेन्ही ट्रक आगीत भम्ससात झाले.
बस्तवडे येथील संभाजी सदाशिव चव्हाण व अन्य तीन शेतकऱ्यांनी विजयसिंहराजे पटवर्धन यांची जमीन गट नंबर ३७७ विकत घेतली आहे. हा सर्व डोंगराळ भाग असल्यामुळे मागील ६ ते ७ महिन्यांपासून जमीन सपाटीकरणाचे काम सुरू आहे. रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान अचानक ब्लास्टिंग यंत्रांचा स्फोट झाला. या भीषण स्फोटाने घटनास्थळापासून दहा किलाेमीटरपर्यंतचा परिसर हादरला. अनेक घरांना तडे गेले. या स्फोटात एक मजूर ठार, तर अन्य दाेन मजूर जखमी झाल्याचे समजते. तहसीलदार कल्पना ढवळे, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
चाैकट
मृतदेहाचे तुकडे अस्ताव्यस्त विखुरले
घटनास्थळी अनेक ठिकाणी मृत व्यक्तीच्या शरीराचे तुकडे ७०० ते ८०० फूट अंतरावर जाऊन अस्ताव्यस्त पडले. तसेच वाहनांचे भागही दूरवर जाऊन पडले.