मिरजेत मोटारीच्या धडकेत एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:32 IST2021-07-07T04:32:53+5:302021-07-07T04:32:53+5:30
मिरज : मिरज कृष्णा घाट रस्त्यावर लक्ष्मी मंदिराशेजारी भरधाव मोटारीने दुचाकीला धडक दिल्याने दिग्विजय सुरेश गुरव (वय ४०, ...

मिरजेत मोटारीच्या धडकेत एक जखमी
मिरज : मिरज कृष्णा घाट रस्त्यावर लक्ष्मी मंदिराशेजारी भरधाव मोटारीने दुचाकीला धडक दिल्याने दिग्विजय सुरेश गुरव (वय ४०, रा. कुरुंदवाड) हे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. दरम्यान, अपघातानंतर मोटार चालक व त्याच्या तीन साथीदारांनी पलायन केले. कृष्णा घाटाकडून मिरजेकडे वेगाने येणाऱ्या (एमएच ०२, जेपी ०७०८) या मोटारीने (एमएच ०९, एएन ७३३) या दुचाकीला जोरदार धडक दिली. मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार उडून रस्त्याच्या कडेला गटारात पडून जखमी झाला. दुचाकीचेही मोठे नुकसान झाले. अपघातानंतर भरधाव मोटार बाजूच्या शेतात उलटली. यावेळी नागरिकांनी जखमी दुचाकीस्वार गुरव यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मोटार उलटल्यानंतर चालक व त्याच्या तीन साथीदारांनी पलायन केले. याबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.