राष्ट्रवादी युवकतर्फे ‘एक हात मदतीचा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:21 IST2021-05-29T04:21:31+5:302021-05-29T04:21:31+5:30

नेर्ले : नेर्ले (ता. वाळवा) येथील राष्ट्रवादी काँग्रेस व वाळवा तालुका युवक राष्ट्रवादीच्यावतीने ‘एक हात मदतीचा’ या अभियानांतर्गत बाहेरील ...

'One hand helping' by NCP youth | राष्ट्रवादी युवकतर्फे ‘एक हात मदतीचा’

राष्ट्रवादी युवकतर्फे ‘एक हात मदतीचा’

नेर्ले : नेर्ले (ता. वाळवा) येथील राष्ट्रवादी काँग्रेस व वाळवा तालुका युवक राष्ट्रवादीच्यावतीने ‘एक हात मदतीचा’ या अभियानांतर्गत बाहेरील गावामध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या नेर्ले गावातील कोरोनाबाधितांना जेवणाचा डबा मोफत देण्याची सोय केली आहे.

पालकमंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रतीक पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाबाधितांना बेड उपलब्ध करून देण्याचा प्रयत्नही करणार असल्याची माहिती युवक राष्ट्रवादीचे सदस्य शुभम पाटील यांनी दिली. कोरोना रुग्णांना ग्रामपंचायत सदस्य निवास माने, सुयोग पाटील, पंकज पाटील विशेष योगदान देत आहेत. लस घेण्यासाठी येणाऱ्या ग्रामस्थांना ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण मिळावे, या हेतूने एक महिन्यासाठी आरोग्य केंद्राच्या पटांगणामध्ये छत घालून सोय केली आहे. यावेळी माजी सरपंच संभाजी पाटील, सदाशिव पाटील, आरोग्य अधिकारी डॉ. सागर शिंदे, आरोग्य सेवक भिकू खोत व मान्यवर उपस्थित होते.

Web Title: 'One hand helping' by NCP youth