वाघमारेवाडी येथे एकाचा कोरोनाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:23 IST2021-03-22T04:23:34+5:302021-03-22T04:23:34+5:30

कोकरूड :- आठ दिवसांपूर्वी मुंबईहून गावी वाघमारेवाडी (येळापूर, ता. शिराळा) येथे आलेल्या पन्नासवर्षीय व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला असून कुटुंबातील ...

One died of corona at Waghmarewadi | वाघमारेवाडी येथे एकाचा कोरोनाने मृत्यू

वाघमारेवाडी येथे एकाचा कोरोनाने मृत्यू

कोकरूड :- आठ दिवसांपूर्वी मुंबईहून गावी वाघमारेवाडी (येळापूर, ता. शिराळा) येथे आलेल्या पन्नासवर्षीय व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला असून कुटुंबातील अन्य एक जण पॉझिटिव्ह सापडला आहे.

सध्या मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आणि लॉकडाऊनच्या भीतीने तालुक्यातील अनेक लोक गावी परतत आहेत. वाघमारेवाडी येथील पन्नासवर्षीय व्यक्ती आठ दिवसांपूर्वी गावी आली होती. गावी आल्याच्या दुसऱ्या दिवशी त्याला ताप आल्याने खाजगी दवाखान्यात उपचार घेतले होते. त्यानंतर, कोकरूड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते. गुरुवारी सायंकाळी उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. मृत्यूनंतर त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून कुटुंबातील आणखी एक पुरुष कोरोनाबाधित झाला आहे. कोरोनाने येळापूर आणि वाडी-वस्तीवरील बळींची संख्या पाचवर गेली आहे.

Web Title: One died of corona at Waghmarewadi