तुजारपूर येथे एकास बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:32 IST2021-07-07T04:32:59+5:302021-07-07T04:32:59+5:30
इस्लामपूर : तुजारपूर (ता. वाळवा) येथे पूर्ववैमनस्यातून सहाजणांच्या टोळक्याने एकास बॅट आणि लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी ...

तुजारपूर येथे एकास बेदम मारहाण
इस्लामपूर : तुजारपूर (ता. वाळवा) येथे पूर्ववैमनस्यातून सहाजणांच्या टोळक्याने एकास बॅट आणि लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. हा प्रकार रविवारी रात्री सव्वादहाच्यासुमारास घडला. यातील हल्लेखोरांविरुद्ध मारहाणीसह गर्दी, मारामारीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अमर अशोक कांबळे (वय ४०) असे जखमीचे नाव आहे. त्याने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार युवराज कांबळे (तुजारपूर), अमोल कांबळे (कामेरी) या दोघांसह अनोळखी चारजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
दोन वर्षांपूर्वी अमर कांबळे याच्यावर विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल आहे. हा खटला सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. रविवारी रात्री अमर हा इतर मित्रांसमवेत घराच्या बाहेर कट्ट्यावर बसला होता. त्यावेळी हल्लेखोरांनी त्याच्यावर लाकडी बॅट आणि लाकडी दांडक्यानी हल्ला चढविला. त्यामध्ये अमरच्या डोक्यात गंभीर मार लागला. यानंतर शिवीगाळ दमदाटी करत हे सर्व हल्लेखोर पसार झाले. हवालदार सचिन यादव अधिक तपास करीत आहेत.