आरेवाडीच्या एकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:20 IST2021-01-10T04:20:25+5:302021-01-10T04:20:25+5:30

---------------------------- पिंपरीच्या एकास मारहाण सांगली: पिंपरी बुद्रुक (ता. आटपाडी) येथील एकास चौघांनी काठीने मारहाण केली. यात नारायण धोंडिराम वाघवेकर ...

One beaten by Arewadi | आरेवाडीच्या एकास मारहाण

आरेवाडीच्या एकास मारहाण

----------------------------

पिंपरीच्या एकास मारहाण

सांगली: पिंपरी बुद्रुक (ता. आटपाडी) येथील एकास चौघांनी काठीने मारहाण केली. यात नारायण धोंडिराम वाघवेकर हे जखमी झाले. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

------------------------------------

कुंभारीचा तरुण अपघातात जखमी

सांगली : कुंभारी (ता. जत) येथील तरुण अपघातात जखमी झाला. पवनकुमार आनंदा शिंदे (वय २७) असे जखमीचे नाव असून शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास हा अपघात झाला. त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

----------------------------------

इंदिरानगर येथील एकास मारहाण

सांगली : शहरातील इंदिरानगर येथील चंद्रकांत अशोक सावंत (वय ३२) या तरुणास मारहाण करण्यात आली. शुक्रवारी रात्री सातच्या सुमारास ही घटना घडली. त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

------------------------------

तिसंगीच्या एकास सर्पदंश

सांगली ; तिसंगी (ता. कवठेमहांकाळ) येथील एकास सर्पदंश झाला. नेताजी धोंडिराम पाटील (वय ५५) असे जखमीचे नाव असून शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. नातेवाइकांनी त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

Web Title: One beaten by Arewadi