शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?
2
इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
3
नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
4
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
5
चंद्रपूर पुन्हा हादरले; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम शिक्षकास अटक
6
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
7
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
8
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
9
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
10
शिंदेसेनेला पुन्हा एकदा सहकाऱ्याचा धक्का, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारचा भाजपमध्ये प्रवेश
11
७०० कोटींचा खर्च केला, पण वंदे भारत ट्रेनची सेवा नाहीच; प्रवाशांची गैरसोय, नाराजी वाढली?
12
Dharmendra : "ते मला नेहमी म्हणायचे की...", धर्मेंद्रजींच्या निधनानंतर सचिनसह विराटही झाला भावूक
13
आता मुंबईतही बिबट्याची दहशत! दिंडोशी म्हाडाच्या बंगल्यात बिबट्याचा संचार
14
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
15
जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या..
16
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
17
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
18
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
19
"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
20
Women’s Kabaddi World Cup 2025: कबड्डीतही भारताच्या लेकी जगात भारी! सलग दुसऱ्यांदा जिंकली वर्ल्ड कप स्पर्धा
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्टोबर हीटचा जनतेला 'ताप'; सांगलीत संसर्गजन्य आजारांचा विळखा, रुग्णालयांमध्ये गर्दी

By संतोष भिसे | Updated: October 8, 2025 16:52 IST

संतोष भिसे सांगली : पावसाने विश्रांती घेताच ऑक्टोबर हीटचा तडाखा बसायला सुरुवात झाली आहे. दिवसा कडक उन्हे आणि रात्री ...

संतोष भिसेसांगली : पावसाने विश्रांती घेताच ऑक्टोबर हीटचा तडाखा बसायला सुरुवात झाली आहे. दिवसा कडक उन्हे आणि रात्री गार वारे यामुळे अवघा जिल्हा तापाने फणफणला आहे. सर्दी, पडसे, खोकला अंगदुखी आणि कणकण अशा आजारांमुळे रुग्णालये फुल्ल झाली आहेत.गेल्या काही दिवसांत जिल्ह्याच्या तापमानात तीन ते चार अंश सेल्सिअसची वाढ नोंदविली गेली आहे. पाऊस थांबला, तरी सर्व पाण्याची तळी साचून आहेत. त्यामुळे डासांचा उद्रेक झाला आहे. परिणामी डेंग्यूसदृश तापाचे रुग्णही आढळत आहेत.

अशी घ्या त्वचेची काळजीया दिवसांत सकाळी आणि रात्री त्वचेसाठी हलका मॉइश्चरायझर घेणे आवश्यक आहे. कडक पाण्याने अंघोळ करू नका. भरपूर पाणी प्यावे. ऑक्टोबर हीटमध्ये त्वचा जळण्यापासून वाचविण्यासाठी सनस्क्रीनचा वापर करावा. नारळाचे तेल त्वचेला लावावे. पुरळ किंवा खाज वाढल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

मुलांच्या प्रकृतीसाठी हे महत्वाचेमुलांच्या संवेदनशील प्रकृतीसाठी सध्याचा कालावधी धोकादायक आहे. दिवसाची कडक उन्हे आणि रात्रीचा गारठा अशा हवामानाशी मुले जुळवून घेऊ शकत नाहीत, त्यामुळे त्यांना उबदार वातावरणात ठेवणे, गरम अन्न देणे आवश्यक असल्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. संसर्गजन्य आजारही वाढत असल्याने त्यांना गर्दीच्या ठिकाणी नेणे टाळावे.

सर्दी, खोकल्यापासून बचाव महत्त्वाचाहवामानातील बदलामुळे सर्दी, खोकला, डोकेदुखी आणि अंगदुखीचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे दिवसा थेट उन्हात फिरणे आणि रात्री उशिरापर्यंत गार वाऱ्यात राहणे टाळावे. रस्त्यावरील खाद्यपदार्थ पूर्णत: वर्ज्य करावेत. विषाणूजन्य आजारांपासून बचावासाठी गर्दीत जाणे शक्यतो टाळावे. रात्री गार वातावरणात कोमट पाणी पिणे फायद्याचे ठरते.

सिव्हिलची ओपीडी वाढलीसोमवारी आणि मंगळवारी सांगली व मिरज शासकीय रुग्णालयातील बाह्यरुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून आले. यातील बहुतांश रुग्ण कणकण आलेले होते. ताप, थंडी, खोकला आणि अंगदुखी असा त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले.

दिवसा ऊन, सायंकाळनंतर गार वारेगेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. दिवसा चांगली उन्हे पडत आहेत. तर सायंकाळनंतर गार वारे वाहत आहेत. या विरोधाभासी हवामानामुळे तापाचे रुग्ण वाढत आहेत. विशेषत: लहान मुलांसाठी हे हवामान अत्यंत प्रतिकूल आहे. त्यांना उबदार खोलीत ठेवावे, गरम अन्न द्यावे आणि बाहेरचे खाद्यपदार्थ देऊ नयेत असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

बदलत्या हवामानामुळे विषाणूजन्य आजार वाढत आहेत. पावसाळ्यातील दूषित वातावरणामुळे आजारांचा त्रास होऊ शकतो. सध्या साथीचे रोग कोठेही नाहीत, मात्र नागरिकांनी कोणताही आजार अंगावर काढू नये. सर्व आरोग्य केेंद्रांत औषधांसह अत्यावश्यक उपचार सुविधा उपलब्ध आहेत. रुग्णांनी तेथे उपचार घ्यावेत. - डॉ. विजयकुमार वाघ, जिल्हा आरोग्याधिकारी

English
हिंदी सारांश
Web Title : October Heat Grips Sangli: Infectious Diseases Surge, Hospitals Overwhelmed

Web Summary : Sangli grapples with October heat, fueling a surge in infectious diseases. Hospitals are overflowing with patients suffering from fever, cold, and body aches. Doctors advise precautions, especially for children, against temperature fluctuations and viral infections.