उपचारांबराेबर शुश्रूषा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:26 IST2021-04-25T04:26:15+5:302021-04-25T04:26:15+5:30
जिल्ह्यात सांगली-मिरज शासकीय रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आराेग्य केंद्रे, महापालिकेची आराेग्य केंद्रे, नगरपालिकांचे दवाखाने या माध्यमातून सुमारे पाच हजारांवर ...

उपचारांबराेबर शुश्रूषा...
जिल्ह्यात सांगली-मिरज शासकीय रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आराेग्य केंद्रे, महापालिकेची आराेग्य केंद्रे, नगरपालिकांचे दवाखाने या माध्यमातून सुमारे पाच हजारांवर पॅरामेडिकल कर्मचारी सेवा देत आहेत. खासगी रुग्णालये, डायग्नाेस्टिक सेंटर्स, पॅथॉलॉजी लॅबमधील संख्या विचारात घेता जिल्हाभरात पॅरामेडिकल क्षेत्रात पन्नास हजारांवर लाेक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या कार्यरत आहेत.
'मेडिकल सायन्स'ला साहाय्यभूत असणाऱ्या सर्व शाखा, सेवा आणि सुविधांना ‘पॅरामेडिकल’ असे संबाेधले जाते. पॅरामेडिकल क्षेत्राच्या सहकार्याशिवाय रुग्णसेवेचे काम होऊच शकत नाही. एका डॉक्टरमागे साधारणत: पॅरामेडिकल क्षेत्रातील ४० विविध क्षेत्रांतील व्यक्ती काम करीत असतात. परिचारिका, एक्सरे-ईसीजी टेक्निशियन, पॅथॉलॉजिस्ट, ऑप्टोमेट्री, डेंटल हायजिन, ऑपरेशन थिएटर टेक्निशियन, फार्मासिस्ट, हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेटर, असे अनेक लाेक वैद्यकीय सेवेसाठी साहाय्यभूत ठरतात.
वेगवेगळ्या आजारांचे निदान रक्त, लघवी, थुंकी, एक्स रे, ईसीजी, सोनोग्राफी, सिटी स्कॅन, एमआरआय आदी आधुनिक उपकरणांच्या साहाय्याने केले जाते. पॅरामेडिकल टेक्निशियनने केलेल्या निदानाच्या आधारावरच डॉक्टर योग्य उपचार करू शकतात. सर्व प्रकारच्या चाचण्या डॉक्टर करू शकत नाहीत किंवा कोणतेही हॉस्पिटल डॉक्टर एकटे चालवू शकत नाहीत. त्यांना पॅरामेडिकल सपाेर्टची गरज असतेच.
वाढती लोकसंख्या आणि वाढत्या आजाराच्या प्रमाणात वाढते हॉस्पिटल्स, पॅथॉलॉजी लॅब, डायग्नाेस्टिक सेंटरर्स यामुळे टेक्निशियन्सची गरजही वाढत आहे. परिचारिका म्हणजे वैद्यकीय सेवेचा कणा आहे. ‘मेडिकल’ची साहाय्य यंत्रणा म्हणून पॅरामेडिकलकडे पाहिले जाते.
सांगली-मिरजेतील शासकीय रुग्णालयांमध्ये १५०० पॅरामेडिकल कर्मचारी कार्यरत आहेत. जिल्ह्यातील विविध प्राथमिक आराेग्य केंद्रांकडे सुमारे १०४८ पॅरामेडिकल कर्मचारी कार्यरत आहेत.
काेट
सध्या विविध आराेग्य केंद्रांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर कामाचा ताण वाढत आहे. वर्षभर सुटी अथवा रजा न घेता कर्मचारी अव्याहतपणे काम करीत आहेत. रिक्त पदे भरल्यास कर्मचाऱ्यांवरील ताण कमी हाेण्यास मदत हाेईल.
- दत्ता पाटील