शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आता इथेनॉलच्या ७५ टक्के हिश्श्यासाठी आंदोलन, राजू शेट्टींचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 13:12 IST

महाविकास आघाडी सरकारने अधिकार नसताना एफआरपीत बदल केला. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हा डाव हाणून पाडला.

नेर्ले : महाविकास आघाडी सरकारने अधिकार नसताना एफआरपीत बदल केला. केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय हा बदल करता येत नाही. तरीही एफआरपीचे दोन तुकडे केले. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळाली. एफआरपीचे दोन तुकडे करण्याचा डाव हाणून पाडला. यापुढे इथेनॉलमधील ७५ टक्के हिश्शासाठीही लढा उभारणार असल्याचा इशारा ‘स्वाभिमानी’चे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिला.तांबवे (ता. वाळवा) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मेळाव्यात उसाच्या एकरकमी एफआरपीसाठी केलेल्या आंदोलनास आलेल्या यशाबद्दल माजी खासदार राजू शेट्टी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष महेश खराडे, बळीराजा शेतकरी संघटनेचे पंजाबराव पाटील, भागवत जाधव, पोपट मोरे, ॲड. एस. यू. संदे यांची प्रमुख उपस्थिती होती.शेट्टी म्हणाले, आता आपण रस्त्यावरची लढाई जिंकलो आहाेत. एफआरपीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात अपील केले आहे. ही लढाई आपल्याला जिंकायची आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी एकरकमी एफआरपी दिली. मात्र, सांगली जिल्ह्यातील कारखानदार तयार नव्हते. मात्र, स्वाभिमानीच्या आंदोलनामुळे त्यांना गुडघे टेकायला लावले. पहिली उचल २२०० ते २३०० रुपये देण्याचे त्यांचे धोरण होते. याने शेतकऱ्यांची सोसायटी तरी फिटली असती का? जिल्हा बँका कारखानदारांना १३ टक्के व्याजाने पैसे देतात. उत्पादन खर्च वाढला आहे. दोन वेळा महापूर येऊन गेला; पण शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला कोण तयार नाही. पण, यावेळी कोणालाही सोडणार नाही.जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले, सांगली जिल्ह्यातील कारखानदार मुर्दाड आहेत. संघटनेच्या आंदोलनामुळे एकरकमी एफआरपी मिळाली. हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी कधी ऊस प्रश्नावर संसदेत आवाज उठवला का? शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोललेत का? त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी देणे-घेणे नाही.युवा आघाडीचे रविकिरण माने यांनी स्वागत केले. संतोष शेळके, जगन्नाथ भोसले, रामराव जाधव, भगवान सुतार, भास्कर मोरे, शंकर पाटील, दत्ताजी पाटील, शिवाजी पाटील, बबन पाटील, अतुल जाधव, नितीन पाटील यांनी संयोजन केले.

शेअर मार्केटच्या नावाने फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावाळवा तालुक्यात शेअर्स मार्केटचे पेव फुटले आहे. तालुक्यात जवळ जवळ अडीचशे ते तीनशे कोटी रुपये शेअर्स मार्केटमध्ये बुडाले आहेत. शेतकऱ्यांच्या पोरांचे पैसे बुडविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; अन्यथा आंदाेलन करू, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.

टॅग्स :SangliसांगलीRaju Shettyराजू शेट्टीSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी