शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

सांगलीत नदीप्रदूषणप्रश्नी महापालिकेला नोटीस, प्र्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 15:55 IST

नदीप्रदूषणास कारणीभूत ठरलेल्या शेरीनाल्याचे सांडपाणी रोखण्याबाबत सोमवारी उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण अधिकारी लिंबाजी भड यांनी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेला नोटीस बजावली. दरम्यान मृत माशांचा खच बाजुला करून महापालिका व परिसरातील सामाजिक संघटनांच्यावतीने नदीस्वच्छता मोहिमेस सुरुवात करण्यात आली आहे.

ठळक मुद्देप्र्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई महापालिका, सामाजिक संघटनांकडून नदी स्वच्छता मोहिमदररोज साडे पाच कोटी लिटर सांडपाणी

सांगली : नदीप्रदूषणास कारणीभूत ठरलेल्या शेरीनाल्याचे सांडपाणी रोखण्याबाबत सोमवारी उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण अधिकारी लिंबाजी भड यांनी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेला नोटीस बजावली. दरम्यान मृत माशांचा खच बाजुला करून महापालिका व परिसरातील सामाजिक संघटनांच्यावतीने नदीस्वच्छता मोहिमेस सुरुवात करण्यात आली आहे.कृष्णा नदीतील प्रदूषणाने कमाल मर्यादा ओलांडल्यामुळे सांगलीत रविवारी नदीतील मासे मृत्युमुखी पडले. मृत माशांचा खच पाण्यावर तरंगताना दुर्गंधीही पसरली होती. सांगलीत यापूर्वीही अनेकदा नदीतील मासे मृत होण्याच्या घटना घडल्या आहेत. तरीही त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते.

पाण्यातील आॅक्सिजन नाहीसा होऊन जलचर प्राण्यांवर परिणाम होत असताना, शासकीय यंत्रणा नेहमीच झोपेचे सोंग घेत असतात. रविवारी पुन्हा त्याच गोष्टीची पुनुरावृत्ती घडली. मासे मृत्यूमुखी पडल्यानंतर महापालिकेला जाग आली. महापालिकेने सोमवारी स्वच्छता मोहिम हाती घेऊन थोडे फार गांभिर्य दाखविण्याचा प्रयत्न केला.प्रदूषण नियंत्रण मंडळाने रविवारी दुपारी नदीची पाहणी करून पंचनामा केला. पाण्याचे नमुनेही तपासणीला घेतले होते. त्यानंतर त्यांनी शेरीनाल्याच्या सांडपाण्याचीही पाहणी केली. पाण्याचा प्रवाह वाढल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे लिंबाजी भड यांनी महापालिकेला सोमवारी नोटीस बजावली.

महापालिकेने तातडीने शेरीनाल्याचे नदीत मिसळणारे सांडपाणी रोखावे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा या नोटीशीद्वारे देण्यात आला आहे. विशेष म्हणजे महापालिकेला आजवर अशा अनेक नोटीसा प्राप्त झाल्या आहेत. प्रत्येकवेळी ते प्रदूषण केल्याप्रकरणी दंड भरून मोकळे होतात. त्यामुळे नागरिकांच्या जिवाशी यानिमित्ताने खेळ सुरू आहे.दररोज साडे पाच कोटी लिटर सांडपाणीसांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रातून दररोज ५ कोटी ६० लाख लिटर सांडपाणी कृष्णा नदीत मिसळत असते. यात एमआयडीसीमधून मिसळणारे सांडपाणी १ कोटी लिटर इतके आहे. त्यामुळे प्रदूषणाचे हे प्रमाण किती भयंकर आहे, याची कल्पना येते. तरीही मंडळ, महापालिका किंवा नदीत सांडपाणी सोडणाऱ्या ग्रामपंचायतींना याचे कोणतेही गांभीर्य नाही.

टॅग्स :Sangliसांगलीpollutionप्रदूषणMuncipal Corporationनगर पालिकाriverनदी