शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

स्वप्न पडले म्हणून कोणी मुख्यमंत्री होत नाही, अजित पवार यांनी जयंत पाटलांना लगावला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 11:57 IST

'निवडणुकीत कोणाचा कार्यक्रम करावयाचा आता जनतेने ठरवावे'

इस्लामपूर : जास्त जागा निवडून आल्या तरी यांना पक्षाचा मुख्यमंत्री करता आला नाही, असा टोला नामोल्लेख टाळून काकांना मारतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इस्लामपूरची बारामती करतो म्हणाऱ्यांनो, सात वेळा संधी दिली. पण तुमच्याकडून काही झाले नाही. त्यांना फक्त मुख्यमंत्री पदाची स्वप्ने पडत आहेत. स्वप्न पडले म्हणून कोणी मुख्यमंत्री होत नाही. ते फक्त भूलथापा मारण्यात पटाईत आहेत. माणसातून माणसाला उठविण्याची त्यांची सवय आहे. आता खोटे बोलणाऱ्यांना सुट्टीवर पाठवण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात आमदार जयंत पाटील यांच्यावर हल्ला चढवला.महाराष्ट्रासह जिल्ह्यात ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्याचा अधिकार कोणालाच नाही. फक्त जनतेलाच आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कोणाचा कार्यक्रम करावयाचा आता जनतेने ठरवावे, असा टोलाही अजित पवार यांनी जयंत पाटील यांचे नाव न घेता मारला. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निशिकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी झालेल्या जाहीर सभेत पवार बोलत होते.ते म्हणाले, महायुतीचे सरकार हे शिव, शाहू, फुले, आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांचे विचारधारा पुढे घेऊन जाणारे आहे. राज्यातील सर्व समाज घटकांना सोबत घेऊन केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्राला देशातील अग्रेसर राज्य बनवण्यासाठी महायुती प्रयत्नशील आहे.आमदार सदाभाऊ खोत, आमदार इद्रीस नायकवडी, सी. बी. पाटील, केदार पाटील, सागर खोत, गौतम पवार यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी सत्यजीत देशमुख, भगवानराव साळुंखे, विक्रम पाटील, भीमराव माने, निवास पाटील, अजित पाटील, अक्षय पाटील, सतेज पाटील, अशोक खोत, प्रवीण परीट आदी उपस्थित होत्या. प्रसाद पाटील यांनी आभार मानले.

अन् आर. आर. आबांनी कबुली दिलीअजित पवार यांनी आपल्या भाषणात आर. आर. आबांची आठवण काढली. ते म्हणाले, तब्बल १२ वर्षांपूर्वी इस्लामपुरातच त्यांना तंबाखुजन्य पदार्थ खाऊ नका, असा मी जाहीर सल्ला दिला होता. मात्र तो आबांनी ऐकला नाही. शेवटी रुग्णालयात भेटायला गेल्यावर आबांनी या गोष्टीची आठवण करून देत दादा तुमचा सल्ला ऐकायला हवा होता, अशी कबुली दिली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४islampur-acइस्लामपूरAjit Pawarअजित पवारJayant Patilजयंत पाटीलwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024