औंढी सरपंचांविरोधात अविश्वास ठराव मंजुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:26 IST2020-12-22T04:26:37+5:302020-12-22T04:26:37+5:30

शिराळा : औंढी (ता. शिराळा) येथील राष्ट्रवादीचे सरपंच अभय पाटील यांच्याविरुद्धच्या अविश्वास ठरावाबाबत झालेल्या विशेष सभेमध्ये सहा विरुद्ध एक ...

No-confidence motion passed against Aundhi Sarpanch | औंढी सरपंचांविरोधात अविश्वास ठराव मंजुर

औंढी सरपंचांविरोधात अविश्वास ठराव मंजुर

शिराळा : औंढी (ता. शिराळा) येथील राष्ट्रवादीचे सरपंच अभय पाटील यांच्याविरुद्धच्या अविश्वास ठरावाबाबत झालेल्या विशेष सभेमध्ये सहा विरुद्ध एक मताने अविश्वासाचा ठराव मंजूर झाला. शिराळा तहसीलदार गणेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा पार पडली.

सरपंच अभय पाटील यांच्याविरोधात १५ डिसेंबर रोजी अविश्वास ठराव तहसीलदारांकडे दाखल केला होता. याबाबत सोमवारी मतदान झाले. त्यावेळी उपसरपंच शिवाजी कांबळे, दिलीप लोहार, सुमन पाटील, लक्ष्मी चव्हाण, आक्काताई गुरव, पल्लवी खोत असे भाजपचे सहा सदस्य उपस्थित होते. राष्ट्रवादीचे एक सदस्य अनुपस्थित राहिले. ठरावाच्या बाजूने सहा विरुद्ध एक असे मतदान झाले.

फोटो-२१शिराळा०३

फोटो ओळ : औंढी (ता. शिराळा) येथील सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव जिकल्यानंतर विजयी खूण करताना ग्रामपंचायत सदस्य.

Web Title: No-confidence motion passed against Aundhi Sarpanch