शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
3
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
4
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
5
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
7
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
10
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
11
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
12
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
13
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
14
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
15
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
16
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
17
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
19
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
20
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप

एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही : गोपीचंद कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 4:44 PM

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 19 जानेवारी रोजी राबविण्यात येत असून लसीकरणापासून कोणतेही बालक वंचित राहणार नाही यासाठी सर्वोतोपरी दक्षता घ्या असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी दिले.

ठळक मुद्दे एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही : गोपीचंद कदमराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 19 जानेवारी रोजी

सांगली : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 19 जानेवारी रोजी राबविण्यात येत असून लसीकरणापासून कोणतेही बालक वंचित राहणार नाही यासाठी सर्वोतोपरी दक्षता घ्या असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी दिले.राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम व पंतप्रधान प्रगती योजना अंतर्भूत राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम झ्र स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान या दोन्ही कार्यक्रमांच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी भूपाल गिरीगोसावी, सहायक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. एस. जोशी, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. कवठेकर, डॉ. विलास पाटील यांच्यासह तालुका वैद्यकीय अधिकारी व आरोग्य यंत्रणेचे विविध अधिकारी उपस्थित होते.दुर्गम गावे, वाड्या वस्त्या, स्थलांतरीत कुटुंबे यातील 0 ते 5 वयोगटातील कोणतेही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही यासाठी यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावे असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी दिले. जिल्ह्यात ग्रामीण, शहरी, महानगरपालिका क्षेत्रात 0 ते 5 वयोगटातील 2 लाख 46 हजार 641 बालके असून त्यांच्या लसीकरणासाठी 1557 बुथ लावण्यात येणार आहेत. लाभार्थींना 2 कि.मी. पेक्षा जास्त अंतर चालत जावे लागणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे.

दिनांक 19 जानेवारी रोजी होणाऱ्या लसीकरणादिवशी सर्व बालकांना लस मिळावी यासाठी 979 ट्रान्झिट टीम दिवसभर कार्यरत राहणार असून या टीम जिल्ह्याच्या सर्व सीमा, नाके, एसटी स्टॅण्ड, रेल्वेस्थानके, टोलनाके आदि ठिकाणी कार्यरत राहून लसीकरण करणार आहेत.

याबरोबरच बांधकामांची ठिकाणे, रस्त्यांची कामे, खाण कामगार, ऊसतोड मजूर, विटभट्या, बगीचे, फुटपाथवरील लाभार्थी, तात्पुरत्या व फिरत्या वसाहती, फिरस्ते, प्रसुतीगृहे, खाजगी दवाखाने, तुरळक वाड्या वस्त्या इत्यादी ठिकाणच्या बालकांच्या लसीकरणासाठी 209 मोबाईल टीमची स्थापना करण्यात आली आहे.20 जानेवारी 2015 नंतर जन्मलेल्या सर्व बालकांची नोंदणी करण्यात येत असून नोंदणी झालेल्या बालकांना बुथचे ठिकाण व दिनांक असलेल्या स्लीपचे वाटप करण्यात येत आहे. लसीकरणासाठी 1557 बुथवर लस पाजक, लेखनिक व केंद्र प्रमुख अशा 4251 व्यक्ती व स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत 2 लाख 46 हजार 641 लाभार्थी बालकांसाठी आवश्यक पोलीओ लस शितसाखळी अबाधित राखून 3 लाख 80 हजार लस डोसचे वाटप करण्यात आले आहे. अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत घेण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती सहायक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. एस. जोशी यांनी दिली. यावर बोलताना अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम म्हणाले, या कार्यक्रमाची मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी. 26 जानेवारी रोजी घेण्यात येणाऱ्या ग्रामसभेमध्ये या विषयाबाबत ठळकपणे माहिती देण्यात यावी.

कुष्ठरूग्णांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या मोहिमेबाबत अधिकाधिक प्रसिध्दी होणे आवश्यक आहे. 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी या कुष्ठरोग निवारण पंधरवड्याअंतर्गत विविध माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करून महात्मा गांधी यांचे वैयक्तिक आणि एकत्रित कुष्ठरोगाचा कलंक आणि कुष्ठरूग्णांमधील भेदभाव संपविण्याचे स्वप्न सर्वजण पूर्ण करण्यासाठी योगदान देवूया, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

टॅग्स :Healthआरोग्यSangliसांगलीcollectorजिल्हाधिकारी