शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

पगार दिला नाही म्हणून साडेनऊ लाखाची रोकडच पळवली, कामगारासह दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2022 16:21 IST

दिलीप मोहिते विटा ( सांगली ) : येथील शिवाजीनगर उपनगरात असलेल्या जिओ मार्ट दुकानातील ९ लाख ३३ हजार रुपयांची ...

दिलीप मोहितेविटा (सांगली) : येथील शिवाजीनगर उपनगरात असलेल्या जिओ मार्ट दुकानातील ९ लाख ३३ हजार रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या दुकानातील कामगारासह त्याच्या साथीदाराला विटा पोलिसांनी गजाआड केले. याप्रकरणी संशयित कामगार मनिष देवदास झेंडे (वय २१, मुळ रा. बलवडी (खा), ता. खानापुर, सध्या रा. नेवरी, ता. कडेगाव) यांच्यासह त्याचा साथीदार पवन मधुकर झेंडे (वय २१, रा. बलवडी (खा), ता. खानापुर) या दोघांना विटा पोलिसांनी अटक करून त्यांच्या ताब्यातील ७ लाख ८० हजार रुपये रोख रकमेसह ८ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दुकान मालकाने पगार न दिल्याने आपण साडेनऊ लाख रक्कम असलेली तिजोरीच पळवल्याचे संशयित कामगार मनीष झेंडे यांने पोलिसांना सांगितले.विटा येथील कराड रस्त्यावरील जीओ मार्ट या ऑनलाईन किराणा दुकानाचे कुलूप तोडून आतील लोखंडी तिजोरीसह ९ लाख ४३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल दि. ९ ऑक्टोबरच्या मध्यरात्री लंपास करण्यात आला होता. याबाबत सर्फराज शिकलगार यांनी विटा पोलिसांमध्ये फिर्याद दिली होती. याबाबत १० ऑक्टोबर रोजी विटा पोलिसात फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी चोरट्यांचा तपास सुरू केला होता.त्यावेळी घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुराव्यानुसार तपास करता या दुकानातीलच कामगार संशयित मनिष देवदास झेंडे याला ताब्यात घेऊन याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार पवन मधुकर झेंडे यास बरोबर घेऊन चोरी केल्याची कबुली दिली.दि. ९ रोजी मध्यरात्री कुलूप तोडून त्यांनी आत प्रवेश करून रोख रक्कम असलेली लोखंडी तिजोरी एका मोटारसायकलवरून पहिल्यांदा घरी नेली. त्यानंतर रात्री फरशी कापायच्या कटरने फोडून आतील पैसे काढले आणि ती फोडलेली तिजोरी नेऊन बुधवारी रात्री भिवघाटातून खाली टाकली असे संशयित झेंडे याने पोलिसांना सांगितले.दरम्यान मनीष झेंडे आणि त्याचा साथीदार पवन झेंडे या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून या गुन्ह्यात वापरलेली ३० हजार रुपयांची दुचाकी, अंदाजे १० हजार रुपये किंमतीची लोखंडी तिजोरी आणि ७ लाख ८० हजार रुपये रोख रक्कम असे एकूण ८ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस