शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक मुक्तीसाठी स्वयंसेवी संस्थांचा पुढाकार : साड्यांपासून पिशव्या; बचत गटांना रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 23:18 IST

प्लास्टिकला पूर्णपणे मूठमाती देत पर्यावरणाच्या संवर्धनासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला असून, कापडी पिशव्यांचे वाटप करण्याबरोबरच महिलांकडून विनावापराच्या साड्या संकलित करून त्यापासून पिशव्या तयार करून त्या

सांगली : प्लास्टिकला पूर्णपणे मूठमाती देत पर्यावरणाच्या संवर्धनासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला असून, कापडी पिशव्यांचे वाटप करण्याबरोबरच महिलांकडून विनावापराच्या साड्या संकलित करून त्यापासून पिशव्या तयार करून त्या व्यावसायिकांना ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वाने उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या संस्थेतर्फे दीड लाखाहून अधिक पिशव्या तयार करून वितरित करण्यात आल्या आहेत. दरम्यान, महिला बचत गटांना आर्थिक पाठबळ देत कापडी पिशव्या शिवून देण्यासाठी बचत गट सरसावले आहेत.

राज्य शासनाने प्लास्टिकवर बंदी घातल्यानंतर त्याच्या पर्यायावर चर्चा सुरू झाली. याचवेळी प्लास्टिक कॅरीबॅगला पर्याय म्हणून कापडी पिशव्या वापरण्यास प्राधान्य देण्याचे आव्हान शहरातील स्वयंसेवी संस्थांनी स्वीकारत ते यशस्वी करून दाखविले आहे. घरा-घरात वापराविना पडून राहिलेल्या साड्यांची संख्या अधिक असते. या साड्यांपासून पिशव्या तयार करता येऊ शकतात, हे ओळखून संस्थांनी साड्या देण्याचे आवाहन केले. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला.

सत्यवेध फाऊंडेशनच्यावतीने अर्चना मुळे यांनी सुरू केलेल्या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळतो आहे. अनेक शाळांनी विद्यार्थ्यांकडून संकलित करून १ हजारावर साड्या दिल्या आहेत. केवळ साड्या मिळवून उपयोग नाही तर पिशव्या शिवण्यासाठी लागणारी पैशांची गरज ओळखून त्यांनी ‘भगिनींनो साड्या द्या, भावांनो पैसे द्या’ उपक्रम राबविला आहे. आजवर त्यांनी ४५ हजारहून अधिक कापडी पिशव्यांचे वाटप केले आहे, तर प्लास्टिक बंदीनंतर मोठी मागणी होत आहे. केवळ सांगलीतच नव्हे, तर कोकणातही त्यांनी पिशव्या पाठविल्या आहेत. प्लास्टिकला पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यावर पूर्णपणे बंदी आणावी, यावर मुळे ठाम आहेत.

किशोर लुल्ला यांनी टी. बी. लुल्ला चॅरिटेबल फाऊंडेशनच्या माध्यमातून कापडी पिशव्यांबाबत जनजागृती चालू केली आहे. त्यांनी स्वच्छ साड्या, पडदे, ब्लाऊज पीस, कटपीस किंवा बेडशीट देण्याचे आवाहन केले आहे. या कपड्यांपासून पिशव्या तयार करून त्या वितरित करण्यात येत आहेत. प्लास्टिक बंदीच्या निर्णयानंतरही त्यांनी पुन्हा आवाहन केले असून, त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या साड्या मिळण्याचे प्रमाण कमी झाल्याने पिशव्या तयार करण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्यांनी आता मिलमधून कापड आणून पिशव्या शिवण्याचे नियोजन केले आहे.बचत गटांना संधीमहिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी कार्यरत असणाºया महिला बचत गटांनाही प्लास्टिक बंदीचा फायदा होणार आहे. स्वयंसेवी संस्थांनी महिला बचत गटांशी संपर्क साधून कापडी पिशव्या शिवून देण्याचे आवाहन केले आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्यावतीनेही महिलांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तालुकापातळीवर कापडी पिशव्या शिवणे, ब्राऊन पेपरची पाकिटे करणे, कागदी पाकिटे तयार करणे आदी प्रशिक्षण दिले जाणार आहे. 

सत्यवेध फाऊंडेशनच्यावतीने सुरू केलेल्या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता कापडी पिशव्या उपलब्ध करून देण्याबरोबरच घरातील प्लास्टिक कमी करण्यासाठी शाळांमध्ये प्लास्टिक संकलन मोहीम सुरू करणार आहोत. विद्यार्थ्यांनी घरातील प्लास्टिक शाळेत जमा करावयाचे असून, ते संकलित केले जाणार आहे. प्लास्टिकला पर्याय असल्याने नागरिकांनी प्लास्टिक बंदीचे स्वागतच करायला हवे.- अर्चना मुळे, सत्यवेध फाऊंडेशनकापडी पिशव्यांना अपेक्षेपेक्षा चांगली मागणी दिसून आली. शहरातील अनेक मोठे दुकानदार, हॉटेल व्यावसायिकांनीही कापडी पिशव्यांची नोंदणी केली आहे. मात्र, सध्या महिला वर्गाकडून साड्या मिळत नसल्याने पिशव्या तयार करण्यास अडचणी येत आहेत. सामाजिक भावनेतून सुरू असलेल्या या कामास चांगला प्रतिसाद मिळत आहे.- किशोर लुल्ला, टी. बी. लुल्ला चॅरिटेबल फाऊंडेशन

टॅग्स :Sangliसांगलीbusinessव्यवसाय