कठड्याच्या कामासाठी मुदत असताना नवा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:09 IST2020-12-05T05:09:18+5:302020-12-05T05:09:18+5:30

दोन वर्षापूर्वी आमणापूर ते औदुंबर या मार्गाचे मुख्यमंत्री सडक योजनेतून काम झाले होते. मुख्यमंत्री सडक योजनेतून या मार्गाची डागडुजी ...

New proposal while deadline for masonry work | कठड्याच्या कामासाठी मुदत असताना नवा प्रस्ताव

कठड्याच्या कामासाठी मुदत असताना नवा प्रस्ताव

दोन वर्षापूर्वी आमणापूर ते औदुंबर या मार्गाचे मुख्यमंत्री सडक योजनेतून काम झाले होते. मुख्यमंत्री सडक योजनेतून या मार्गाची डागडुजी व दुरूस्तीचे काम पाच वर्षे करायचे असताना, नव्याने या संरक्षक कठड्याच्या कामाचा प्रस्ताव अधिकारी वर्गाला हाताशी धरून केला जात आहे. काम करतानाच निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे संरक्षक कठडे नदी पात्रात खचून गेले आहेत. कामाची मुदत शिल्लक असताना नव्याने काम मंजूर करून शासनाची फसवणूक सुरू आहे. ती थांबविण्यासाठी अंकलखोप येथील नागरिकांनी तहसीलदारांकडे निवेदन देणार आहेत.

फोटो-०४अंकलखोप१.२

फोटो ओळ : आमणापूर ते औदुंबर रस्त्यावरील नदी पात्रात खचलेले संरक्षक कठडे.

Web Title: New proposal while deadline for masonry work