शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

सायबर चोरट्याचे नवे जाळे; सांगलीत म्युल अकाउंटमधून सायबर लूट, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 12:22 IST

काय आहे म्युल अकाउंट?, ३४ डेबिट कार्ड, २७ सिमसह संशयित अटकेत

सांगली : जिल्ह्यातील ३७ ग्राहकांची बँक खाती भाड्याने घेऊन त्यांचा वापर सायबर फसवणुकीसाठी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी जैब जावेद शेख (वय २२, रा. मिरा हौसिंग सोसायटी, ओंकार अपार्टमेंट, प्लॅट क्र. ६, टिंबर एरिया, सांगली) याला अटक केली आहे.आरोपीकडून ३४ डेबिट कार्ड, २७ मोबाइल सिमकार्ड, ६ मोबाइल फोन, तसेच चारचाकी वाहन, असा एकूण ११ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.जिल्ह्यात सायबर लूट करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले. म्युल अकाउंटचा वापर करून फसवणुकीचा नवा प्रकारच समोर आला आहे. यामध्ये सायबर चोरटे विविध व्यक्तींची बँक खाती भाड्याने घेऊन त्यावर फसवणुकीची रक्कम वर्ग करतात. जिल्ह्यात अशा प्रकारे बँक खाती भाड्याने दिली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर सायबर पोलिसांनी शोधमोहीम राबवली. तपासात संशयित जैब जावेद शेख हा त्याच्या साथीदारांच्या मदतीने सांगलीसह इतर ठिकाणच्या बँक खात्यांमधून संशयास्पद व्यवहार करत असल्याचे निष्पन्न झाले.पोलिसांनी शेख याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याच्या चारचाकी वाहनातून ३४ डेबिट कार्ड, २७ सिमकार्ड, चार लाख रुपये किमतीचे ६ मोबाइल आढळून आले. पोलिसांनी वाहनासह ११ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या खात्यांचा वापर ऑनलाइन सायबर फसवणुकीसाठी होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर विश्रामबाग पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलिस निरीक्षक संजय हारुगडे, सहायक पोलिस निरीक्षक रुपाली बोबडे, तसेच पोलिस कर्मचारी करण परदेशी, रेखा कोळी, रुपाली पवार, सलमा इनामदार, विवेक साळुंखे, अभिजित पाटील, इम्रान महालकरी अजय पाटील, अजय बेंदरे, दीपाली नेटके, शांतव्वा कोळी, गणेश नरळे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी केली.

काय आहे म्युल अकाउंट?मागील काही महिन्यांपासून सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत असून, ‘म्युल अकाउंट’ हा नवा प्रकार समोर आला आहे. यामध्ये विविध व्यक्तींची बँक खाती काही कालावधीसाठी भाड्याने घेवून त्याबदल्यात खातेदारांना दरमहा ठरावीक रक्कम दिली जाते. या खात्यांद्वारे सायबर फसवणुकीतून मिळवलेले पैसे नेट बँकिंगद्वारे इतर खात्यांत वर्ग केले जातात, रोख स्वरूपात काढले जातात किंवा क्रिप्टो करन्सीत रूपांतरित केले जातात.

English
हिंदी सारांश
Web Title : Cyber Thieves' New Net: Mule Accounts Used in Sangli Loot

Web Summary : Sangli police busted a cyber fraud racket using mule accounts. An individual was arrested for renting bank accounts for fraudulent transactions, seizing ₹11.05 lakhs worth of assets, including debit cards and mobile phones.