शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

आटपाडीतील शिक्षकाच्या संकेतस्थळावर ‘नेटीझन्स’च्या उड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 00:57 IST

आटपाडी : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील गुरुजींबद्दल आदराची भावना फारशी दिसत नसताना, कौठुळी (ता. आटपाडी) येथील प्राथमिक शाळेतील परशुराम शिंदे या शिक्षकांनी कमाल केली आहे.

ठळक मुद्देदहा महिन्यांतच उपक्रमास लोकप्रियता : अध्ययन, अध्यापनासाठी केला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

अविनाश बाड ।आटपाडी : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील गुरुजींबद्दल आदराची भावना फारशी दिसत नसताना, कौठुळी (ता. आटपाडी) येथील प्राथमिक शाळेतील परशुराम शिंदे या शिक्षकांनी कमाल केली आहे. त्यांनी ‘माझी शाळा’ नावाचे संकेतस्थळ निर्माण केले आहे. केवळ १० महिन्यात महाराष्ट्रातूनच नव्हे, तर ब्राझील, रशिया ते अगदी अमेरिकेतील आठ लाखांपेक्षा अधिक नेटीझन्सनी या संकेतस्थळाला भेट दिली आहे.

अत्यंत हलाकीच्या परिस्थितीतून शिक्षण घेत शिक्षक झालेले परशुराम श्ािंदे मूळचे सोलंकरमळा, मुक्काम हिवरे, पोस्ट धावडवाडी, ता. जत येथील. २०१४ पासून ते कौठुळीत नोकरीस आहेत. माहिती-तंत्रज्ञानाच्या या युगात प्रत्यक्ष शिक्षक, पालक मोबाईलचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. पण मोबाईलचा केवळ संभाषणापुरताच उपयोग न करता, अध्ययन, अध्यापन प्रक्रिया आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठीही मोबाईलचा वापर व्हावा, यासाठी त्यांनी शैक्षणिक संकेतस्थळाची निर्मिती केली.

‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट पीडीशिंदे डॉट ईन’ असा मजकूर इंटरनेट ब्राऊजरवर सर्च करताच ‘माझी शाळा’ हे संकेतस्थळ आपल्यासमोर झळकते. तिथे शिक्षक आणि मुख्याध्यापकांसाठी शाळेसाठी लागणारे वेळापत्रक, वार्षिक नियोजन अभ्यासक्रम, कार्यालयीन कामकाजासाठी लागणारे विविध कोरे अर्ज, दाखले, प्रतिज्ञापत्रे, शाळेत वर्षभर राबविण्यासाठी विविध शालेय उपक्रम, परीक्षा, चाचण्या यांचे नमुने, सरावासाठी प्रश्नपत्रिका, शालेय पोषण आहार, वार्षिक निकालपत्र, मूल्यमापन नोंदी यांची वापरण्यास अतिशय सोपे व महाराष्ट्रातील शिक्षकांच्या पसंतीस उतरलेले आणि श्ािंदे यांनी तयार केलेले सॉफ्टवेअर, साहित्याचा खजिना, महत्त्वाचे शासननिर्णय, शैक्षणिक घडामोडी असे बरेच काही उपलब्ध आहे.

विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कला विभाग, संस्कारकथा, बोधकथा, गोष्टी, बालगीते, बडबडगीते, थोर पुरुषांची जयंती-पुण्यतिथी, मोबाईल, संगणक वापराची माहिती, उत्तम आरोग्यासाठी आरोग्यमंत्र, जनरल नॉलेज, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, जीवन प्रेरणा आवर्जून वाचावेत असे लेख, कवितासंग्रह, नेहमी लागणारी संकेतस्थळे अशी भरगच्च माहिती या संकेतस्थळावर आहे. त्यामुळेच त्याला प्रतिसाद वाढत आहे. देश-विदेशातील लोकांना ही वेबसाईट आकर्षित करू लागली आहे.देश-विदेशातील नेटीझन्स वेबसाईटच्या भेटीला...परशुराम श्ािंदे या शिक्षकाने दि. ११ जून २०१७ रोजी निर्माण केलेल्या या संकेतस्थळावर नेटीझन्सनी अक्षरश: उड्या टाकल्या आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रासह देशातून ७ लाख ११ हजार २१४, अमेरिकेतील ६४ हजार ७९३ जणांनी, तर इंडोनेशियातील ६९१६, जर्मनीतील २२३२, सिंगापूरमधील ९२४, रशियातील ७९४, चीनमधील ७५९, केनियातील ६१७, युनायटेड अरब अमिरातीमधून २५४, तर ब्राझीलमधून १९४ जणांनी भेट दिली आहे... 

प्राथमिक शाळांसमोर अनेक आव्हाने आहेत. गुणवत्ता वाढावी, शिक्षकांना अध्ययन, अध्यापनात मदत होऊन त्यांचा वेळ वाचावा, कारकुन, शिपाई नसलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये लागणारे अर्ज, तक्ते, सर्व साहित्य, माहिती यासाठी विनाखर्च मदत व्हावी आणि गुणवत्तेत वाढ होऊन खासगी शाळांकडे वळू पाहणारे विद्यार्थी, पालक जिल्हा परिषदेच्या शाळांकडे वळावेत, या एकमेव हेतूने संकेत स्थळाची निर्मिती केली.- परशुराम शिंदे , उपशिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कौठुळी

टॅग्स :SangliसांगलीSchoolशाळा