शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
3
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
4
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
5
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
7
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
8
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
9
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
11
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
14
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
15
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
16
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
17
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
18
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
19
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
20
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश

Sangli Crime: दमदाटी केल्याने शेजाऱ्याने सुपारी देऊन टाकला उटगीतील ‘तो’ दरोडा; दोघांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 17:14 IST

जाताना शेळ्या चोरल्या

सांगली : उटगी (ता. जत) येथील वस्तीवर दरोडा टाकून दोघा भावांना मारहाण करून दहा लाखांचा ऐवज लुटणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने पर्दाफाश केला. सुरेश मनोहर काळे (वय ५५, रा. सांगली रस्ता तांडा, जत), पप्पू सुरेश परीट (वय ५५, रा. परीट वस्ती, उटगी) या दोघांना अटक केली. आरोपी परीट याला फिर्यादीच्या भावाने एका प्रकरणात दमदाटी केल्यामुळे त्याने सुपारी देऊन दरोडा टाकायला लावल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उटगी येथील तेली वस्तीवर राहणाऱ्या चांदसाब बाबासाब मुल्ला यांच्या घरावर दि. २१ रोजी मध्यरात्रीनंतर दोन वाजता आठ जणांच्या टोळीने दरोडा टाकला. मुल्ला यांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यामुळे मुल्ला कुटुंब जागे झाले. तेव्हा चांदसाब आणि भाऊ साहेबलाल या दोघांना दरोडेखोरांनी मारहाण करून रोकड, सोन्याचे दागिने असा सुमारे दहा लाखांचा ऐवज लुटून नेला. याबाबत चांदसाब यांनी उमदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. हा दरोडा गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी गुन्हे अन्वेषणच्या पथकाला छडा लावण्याचे आदेश दिले होते. गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी एक स्वतंत्र पथक स्थापन केले होते.सहायक निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील कर्मचारी नागेश खरात, संदीप नलावडे यांना जत येथील सुरेश मनोहर काळे याने साथीदारांच्या मदतीने दरोडा टाकल्याची माहिती मिळाली. काळे याला ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत त्याने उटगी येथील परिचित पप्पू परीट याच्या सांगण्यावरून दरोडा टाकल्याची कबुली दिली.पथकाने पप्पूला ताब्यात घेतल्यानंतर त्याने सांगितले की, गावातील एका प्रकरणात साहेबलाल मुल्ला याने विरोध केला होता. तसेच त्याला दमदाटी केली होती. त्यामुळे पप्पूला त्याचा बदला घेऊन धडा शिकवायचा होता. त्यासाठी त्याने सुरेश काळे याला दरोडा टाकण्याची सुपारी दिली. काही पैसे देऊन घरात घुसून दरोडा टाकण्यास सांगितले. त्यानुसार काळे याने त्याच्या साथीदारांना बोलवून दरोडा टाकल्याचे तपासात स्पष्ट झाले. दोघांना ताब्यात घेऊन उमदी पोलिसांच्या ताब्यात दिले. काळे याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे.गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक पंकज पवार, उमदीचे सहायक निरीक्षक संदीप कांबळे, गुन्हे अन्वेषणचे अनिल कोळेकर, अमर नरळे, सतीश माने, दऱ्याप्पा बंडगर, सागर लवटे, संदीप गुरव, महादेव नागणे, सागर टिंगरे, मच्छिंद्र बर्डे, आमसिद्ध खोत, सोमनाथ गुंडे, उदय माळी, संदीप गुरव, अमिरशा फकीर, विक्रम खोत, केरूबा चव्हाण, गणेश शिंदे, सुशांत चिले यांच्या पथकाने कारवाई केली.

जाताना शेळ्या चोरल्याउटगी येथे दरोडा टाकल्यानंतर मोटारीतून पळून जाताना वाटेत बनाळी (ता. जत) गावातील एका वस्तीवरून शेळ्या चोरून नेल्याचे काळे याने सांगितले. त्यानुसार हा गुन्हाही दाखल झाला आहे.

दरोडेखोर काळे रेकॉर्डवरीलदरोडेखोर काळे हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर घरफोडी, जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याने परजिल्ह्यातील साथीदारांना बोलावून दरोडा टाकल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.