शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

कठीण पेपरमुळे ‘नीट’चे मेरीट खाली येणार, विस्तृत प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 13:37 IST

पुरेसा वेळ मिळाला नसल्याची खंत

सांगली : यंदा ‘नीट’च्या कठीण पेपरमुळे वैद्यकीय प्रवेशासाठीचे मेरीट खाली येण्याची दाट शक्यता आहे. विस्तृत प्रश्नांमुळे वेळ कमी पडल्याची खंत काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. मागील वर्षाच्या नेमकी उलट परिस्थिती यावेळी मेरीटमध्ये दिसून येईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक नीट २०२५ची परीक्षा यंदा देशभरात सुरळीत पार पडली. ‘नीट’ परीक्षेत गतवर्षी झालेले गैरप्रकार आणि तुलनेने सोपा पेपर यामुळे मेरीट मोठ्या प्रमाणात वाढले होते. गतवर्षी ७२० पैकी ७२० गुण मिळविणारे तब्बल ६७ विद्यार्थी होते. यासंदर्भात विविध न्यायालयांत याचिका दाखल झाल्यानंतर फेरतपासणीअंती पैकीच्या पैकी गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ५ वर आली. वैद्यकीय प्रवेशासाठीचे मेरीट गेल्यावर्षी मोठ्या प्रमाणात वाढले होते. यावर्षी मात्र नेमकी याउलट स्थिती सर्वत्र दिसून येत आहे.

मोठ्या अपेक्षेने चांगले गुण मिळतील म्हणून नीट परीक्षेला गेलेले अनेक विद्यार्थी निराशेने बाहेर पडले. बायोलॉजीच्या पेपरमधील प्रश्न प्रचंड विस्तृत असल्याने ते वाचण्यातच अनेक विद्यार्थ्यांचा वेळ गेला. त्यामुळे केमेस्ट्री आणि फिजिक्स या विषयांसाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळाला नाही. केमेस्ट्री तसा तुलनेने सोपा असला तरी फिजिक्स मात्र सर्वात कठीण होता, असे काही विद्यार्थ्यांनी सांगितले. गेल्या १० वर्षांत इतका कठीण पेपर कधीच आला नसल्याचे मत विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी व्यक्त केले आहे. अनेक पालक आणि विद्यार्थ्यांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सी विरुद्ध संताप व्यक्त केला आहे.

पेपर कठीण असला तरी विद्यार्थी आणि पालकांनी निराश होण्याचे कारण नाही. नीट परीक्षेतील गुणांपेक्षा ऑल इंडिया रँक, महाराष्ट्रातील रँक आणि कॅटेगरी रँक यावरच वैद्यकीय शाखेतील प्रवेश अवलंबून आहे. विद्यार्थ्यांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत अडीच लाखाने कमी असल्याने रँक चांगली येईल, अशी अपेक्षा आहे. यावर्षी मेरीट मोठ्या प्रमाणात खाली येईल. - डॉ. परवेज नाईकवाडे, समुपदेशक, वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया, सांगली

टॅग्स :SangliसांगलीMedicalवैद्यकीयexamपरीक्षाStudentविद्यार्थी